शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

कष्टकऱ्यांच्या वसाहतीचा कायापालट; उस्मानपुरा, मिलिंदनगर, एकनाथ नगरात आता टुमदार घरे

By साहेबराव हिवराळे | Published: April 11, 2024 6:58 PM

एक दिवस एक वसाहत: शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने रोज मजुरी करणाऱ्यांनीही आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी मजूर व कष्टकऱ्यांच्या समजल्या जाणाऱ्या उस्मानपुरा, कबीरनगर, मिलिंदनगर, एकनाथनगर, द्वारकापुरी, तुळशी हाउसिंग सोसायटी, नागसेननगरात पुढील पिढीने डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सरकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारली असून तिसरी पिढी बँकिंग, काॅर्पोरेट सेक्टर, तसेच उद्योजकतेकडे वळलेली दिसत आहे. झोपड्यांच्या जागी टुमदार दुमजली घरे उभारली गेली आहेत. तरीही येथे काही नागरी समस्या आहेतच.

शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने रोज मजुरी करणाऱ्यांनीही आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला. परिसराच्या लगत शालेय शिक्षणापासून ते तांत्रिक शिक्षणाची ज्ञानमंदिरे आहेत. बहुतांश पाल्य उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. आई-वडिलांनी सहन केलेले काबाडकष्ट पाहून शिक्षण घेऊन स्मार्ट वर्क करण्याकडे येथील विद्यार्थ्यांचा कल दिसत आहे.

संरक्षण कुंपण हवेनवीन कबीरनगरच्या रस्त्याचे काम रखडलेले असल्याने रस्ता उखडलेलाच असून, नागरिकांना औद्योगिक वसाहतीत जाणे अडचणीचे ठरत आहे. समाज कल्याण विभागाकडून अभ्यासिका तसेच बुद्ध विहाराचे मोठे काम सुरू असून , मोकळ्या मैदानांना संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे.- दीपक निकाळजे

पाण्याची अशुद्धता वाढल्याने आरोग्यास धोकापरिसरात सध्या थंडीताप तसेच अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार, गालफुगी इ. आजार सुरू आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. औषध फवारणी करणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी धूर व औषध फवारणी करून डास निर्मूलन करावे.- डॉ. एस.पी. मोहिते

लोंबकळलेल्या तारा अन् उघडी डीपीवीजपुरवठा सुरळीत असला किंवा नसला तरी अनेक गल्लीत लोंबकळणाऱ्या विजेच्या धोकादायक तारा दिसत आहेत. ट्रान्सफार्मर रस्त्याच्या कडेस असल्याने दुर्घटनेची भीती आहे. कारण मोकळ्या मैदानावर मुले खेळतात. महावितरणने येथे डीपी का उघडी ठेवलेली आहे, असा प्रश्न पडतो.- अल्लाउद्दीन कुरेशी

बहुतांश मुले उद्योग व्यवसायाकडे...व्यावसायिक शिक्षणामुळे मजुरी करण्याऐवजी स्वत:चे उद्योग व्यवसाय काढण्याकडे लक्ष केंद्रित केल्याने नवी पिढी उद्योगाकडे वळली. इतरांना रोजगार कसा देता येईल, असा विचार आताची पिढी करीत असल्याने त्याचा परिणाम दिसत असून उस्मानपुरा, मिलिंदनगर, फुलेनगर, एकनाथनगर, द्वारकापुरी इ. भागांतील राहणीमान देखील बदलू लागले आहे.- अनिल रगडे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका