राज्यातील 'एसटी'च्या ११ विभाग नियंत्रकांच्या बदल्या
By संतोष हिरेमठ | Updated: August 4, 2022 18:45 IST2022-08-04T18:44:45+5:302022-08-04T18:45:25+5:30
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या स्वाक्षरीने बदल्या करण्यात आल्या

राज्यातील 'एसटी'च्या ११ विभाग नियंत्रकांच्या बदल्या
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या राज्यातील ११ विभागाच्या विभाग नियंत्रकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या स्वाक्षरीने बुधवारी (ता. ३) राज्यातील ११ विभागाच्या विभाग नियंत्रकांच्या प्रशासकीय कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत बदल्या (कंसात बदलीचे ठिकाण):
अनघा बारटक्के -रायगड (कोल्हापूर), सागर पळसुले- सातारा (अकोला), रोहन पलंगे -कोल्हापूर (सातारा), विजय गिते- नगर (धुळे), अरुण सिया -औरंगाबाद (नाशिक), प्रमोद नेहूल -जालना (लातूर), सचिन क्षिरसागर- लातूर (औरंगाबाद), श्रीकांत गभणे -अमरावती (नागपूर), संदिप रायवार -बुलढाणा (वर्धा), चेतन हासबनीस -वर्धा (बुलढाणा) या सर्व प्रशासकीय बदल्या आहेत. तर मनिषा सपकाळ धुळे (नगर) यांची विनंतीवरुन बदली करण्यात आली आहे.