करमाडमध्ये पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:22 IST2019-03-29T22:21:10+5:302019-03-29T22:22:31+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाड पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याच्या हद्दीतील गावात पथसंचलन करण्यात आले.

करमाडमध्ये पोलिसांचे पथसंचलन
करमाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाड पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याच्या हद्दीतील गावात पथसंचलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.
करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी करमाड व पिंप्रीराजा गावात पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर,सी. आय. एस. एफ चे पोलीस निरीक्षक बिपीन बिहारी यांच्या नेतृत्वाखाली करमाड पोलीस ठाण्याचे, सी. आय. एस.एफ.गृहरक्षक दलाच्या जवानांनी पथसंचलन करून शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.