वाहतूक पोलिसाला झोडपले
By Admin | Updated: December 4, 2014 00:25 IST2014-12-04T00:25:47+5:302014-12-04T00:25:47+5:30
औरंगाबाद : कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने बेदम झोडपल्याची घटना काल सायंकाळी जालना रोडवरील एपीआय कॉर्नरवर घडली.

वाहतूक पोलिसाला झोडपले
औरंगाबाद : कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने बेदम झोडपल्याची घटना काल सायंकाळी जालना रोडवरील एपीआय कॉर्नरवर घडली.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी शिवाजी शंकर आढवे हे सायंकाळी एपीआय कॉर्नरवर वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांविरुद्ध कारवाई करीत होते. त्यावेळी त्यांनी आरोपी समद युसूफ शेख सलीम (रा. मोहमंदिया कॉलनी, बीड) याची रिक्षा अडविली.
रिक्षावर कारवाई सुरू करताच आरोपी व त्याच्या साथीदाराने ‘ तू आमची रिक्षा कशी जप्त करतो’ असे म्हणत आढवे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.