मोहटादेवी चौकात वाहतूक कोंडी
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:31+5:302020-12-04T04:09:31+5:30
-------------------- साठेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष वाळूज महानगर : वाळूजच्या अण्णा भाऊ साठेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली ...

मोहटादेवी चौकात वाहतूक कोंडी
--------------------
साठेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर : वाळूजच्या अण्णा भाऊ साठेनगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. नागरिक उघड्यावर व रस्त्यावरच केरकचरा आणून टाकत असल्यामुळे वसाहतीत दुर्गंधी पसरत आहे. या वसाहतीत ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी फिरकत नसल्यामुळे कचरा साचत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाले आहे.
----------------------------
सिएट रोडवर जडवाहनाचा अघोषित थांबा
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील सिएट रोडवर रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असतात. या जडवाहनामुळे कारखान्यात येणाऱ्या उद्योजक, कामगार तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या जडवाहनामुळे रात्री कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी परतणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरुनच घरी जावे लागते. या रोडवरील जडवाहनाचा अघोषित थांबा स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
वाल्मी रोडवर खड्ड्याचे साम्राज्य
वाळूज महानगर : बजाज गेटकडून वाल्मीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. गत तीन-चार वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले होते. मात्र अल्पवधीतच या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना लिंकरोड मार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे.
--------------------
एफडीसी चौकात अपघाताचा धोका
वाळूज महानगर : पंढरपुरातील तिरंगा चौकातून रांजणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एफडीसी चौकात सदोष गतिरोधक टाकण्यात आल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या गतिरोधकाची उंची जास्त असल्यामुळे दुचाकीस्वार व छोट्या वाहनधारकांना गतिरोधकावरुन ये-जा करताना कसरत करावी लागते. या गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
बजाजनगरात खदानीत कचऱ्याची विल्हेवाट
वाळूज महानगर : बजाजनगरातील खदानीत कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या खदानीत लगतच्या वसाहतीतील नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच भाजीपाला विक्रते जमा झालेला केर-कचरा व टाकाऊ खाद्य पदार्थ खदानीत आणून टाकत असतात. खदानीत पाण्यात हा कचरा सडून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.
---------------------------
पंढरपूर-साऊथसिटी रोडवर पथदिवे बसवा
वाळूज महानगर : पंढरपूर ते साऊथसिटी या रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. पूर्वी सिडकोच्यावतीने गोलवाडी फाट्यापासून गरवारे कंपनीपर्यंत पथदिवे बसविले होते. मात्र पथदिव्याचे वीज बिल भरण्यावरुन स्थानिक ग्रामपंचायती, सिडको व एमआयडीसी प्रशासनात वाद सुरु असल्यामुळे हे पथदिवे बंद आहेत. पथदिवे सुरु करण्याची मागणी सुनील शेळके, लक्ष्मण शिंदे, सुभाष भालेराव आदींनी केली आहे.
---------------------------