भीम जयंतीनिमित्त छ. संभाजीनगरात मोठे वाहतूक बदल; १३-१४ एप्रिलला 'हे' मार्ग राहतील बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:25 IST2026-04-13T17:23:35+5:302026-04-13T17:25:01+5:30

वाहनधारकांनो लक्ष द्या! मिलकॉर्नर, क्रांती चौक आणि भडकल गेट मार्गावर बदल; पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

Traffic Diversions in Chhatrapati Sambhajinagar for Bhim Jayanti on April 13 & 14 | भीम जयंतीनिमित्त छ. संभाजीनगरात मोठे वाहतूक बदल; १३-१४ एप्रिलला 'हे' मार्ग राहतील बंद

भीम जयंतीनिमित्त छ. संभाजीनगरात मोठे वाहतूक बदल; १३-१४ एप्रिलला 'हे' मार्ग राहतील बंद

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होता. त्यामुळे १३ व १४ एप्रिलला शहरातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायी १३ एप्रिलच्या रात्री आणि १४ एप्रिलला दिवसभर येत असतात. त्याशिवाय याच परिसरात रॅली, मिरवणुकाही काढण्यात येतात. त्यामुळे परिसरातील मार्गावरील वाहतुकीत बदल केल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. हे वाहतूक बदल पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू असणार नाहीत.

१३ एप्रिलला वाहतूक मार्गातील बदल
सोमवारी, १३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत मिलकॉर्नर ते सिटी क्लब या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यास पर्यायी मार्ग म्हणून जळगावकडून येणारी वाहने हर्सूल टी-जळगाव टी-जालना रोड-अमरप्रीत चौक, महावीर चौक मार्गे जातील व येतील. दिल्ली गेटकडून येणारी वाहने सीटी क्लब, महापालिका कार्यालय, टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून-मकईगेट-बेगमपुरा-विद्यापीठ मार्गे पुढे जातील. दिल्ली गेटकडून येणारी वाहने सीटी क्ल बस महानगरपालिका कार्यालय, मुलींचे आयटीआय, खडकेश्वर मार्गे पुढे जातील. मध्यवर्ती बसस्थानक येथून येणारी वाहने मिलकॉर्नर कार्तिकी चौक, महावीर चौक, सेशन कोर्टस क्रांती चौक, आकाशवाणी, जळगाव-टी मार्गे जातील व येतील.

१४ एप्रिलला वाहतूक मार्गातील बदल: 
मंगळवारी, १४ एप्रिलला सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत हे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहेत.
- महावीर चौक ते अमरप्रीत चौक.
- गोपाल टी-क्रांती चौक-सिल्लेखाना-पैठणगेट-बाराभाई ताजिया-गुलमंडी-सुपारी हनुमान मंदिर-सीटी चौक-जुना बाजार-मुख्य पोस्ट ऑफिस- भडकल गेट.
- शहागंज-गांधीपुतळा-सराफा-सीटी चौक.
- औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजीया.
- मिल कॉर्नर ते सीटी क्लब.
- एन-१२ नर्सरी, गोदावरी पब्लिक स्कूल-टीव्ही सेंटर, एन-९, अयोध्यानगर-शिवनेरी कॉलनी-एन-७-शॉपिंग सेंटर या मिरवणूक मार्गावरील वाहतूक मिरवणूक सुरू असेपर्यंत एकेरी मार्गावरून वळविण्यात येईल.

Web Title : भीम जयंती पर छत्रपति संभाजीनगर में यातायात परिवर्तन: सड़कें बंद।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में भीम जयंती के कारण 13-14 अप्रैल को यातायात बदला गया है। भडकल गेट के पास के मुख्य मार्ग सभाओं और जुलूसों के कारण बंद रहेंगे। वैकल्पिक मार्ग दिए गए हैं; प्रतिबंध आपातकालीन सेवाओं पर लागू नहीं होते हैं।

Web Title : Traffic diversions in Chhatrapati Sambhajinagar for Bhim Jayanti: Roads closed.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces traffic changes on April 13-14 for Bhim Jayanti. Key routes near Bhadkal Gate will be closed due to gatherings and processions. Alternative routes are provided; restrictions exclude emergency services.