शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा घाटात तिहेरी अपघातानंतर ४ तास वाहतूक ठप्प; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:35 IST

तिहेरी अपघाताची ही घटना घडल्यानंतर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांचे मोठे हाल झाले.

सिल्लोड : अजिंठा-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात सोमवारी (ता. २३) दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास एक ट्रक नालीमध्ये गेल्यानंतर त्यामागे असलेला हायवा कठड्याला धडकला. यामुळे तो रस्त्यावर आडवा झाला. त्याला जाऊन एक कंटेनर धडकला. या तिहेरी अपघातामुळे जवळपास ४ तास अजिंठा घाटात वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाट उतरत असताना, एका ट्रकचालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेला. त्यानंतर काही वेळातच पाठीमागून आलेल्या हायवा चालकाने समोरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, त्यास अचानक पुढील घसरलेला ट्रक दिसल्याने जोरात ब्रेक दाबले. त्यामुळे हायवावरील नियंत्रण सुटले आणि हायवा घाटाच्या कठड्यावर आदळून रस्त्यावर आडवा झाला. त्याला जाऊन एक कंटेनर धडकला सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४ तास वाहतूक ठप्प झाली होती.

वाहनधारकांचे मोठे हालतिहेरी अपघाताची ही घटना घडल्यानंतर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांना तासन्तास अडकून बसावे लागले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात