शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील व्यापाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर हवे ‘व्यापारी कल्याण मंडळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:16 IST

महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे

छत्रपती संभाजीनगर : राज्यच नव्हे तर देशाच्या विकासात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षा निर्माण करणे, व्यापारी हित व व्यवसायाच्या वृद्धीसाठी विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने नुकतेच दिल्ली सरकारने ‘ व्यापारी कल्याण मंडळा’ची स्थापना केली आहे. याचा तेथील ८ लाख व्यापाऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली.

कोणत्या राज्यात आहे ‘व्यापारी कल्याण मंडळ’?देशात हरियाणा, उत्तर प्रदेशात ‘व्यापारी कल्याण मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. त्यांचे कामकाजही सुरळीत सुरू आहे. त्यापाठोपाठ नुकतेच दिल्ली सरकारनेही ‘व्यापारी कल्याण मंडळ’ स्थापन केले.

काय आहेत फायदे?कर्ज : व्यापारी कल्याण मंडळाकडून व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते.अनुदान : काही विशेष परिस्थितीत, मंडळाकडून व्यापाऱ्यांना आर्थिक अनुदान मिळू शकते.विमा संरक्षण : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आरोग्य विमा, जीवन विमा आणि इतर विमा योजनांचा लाभ मिळतो.व्यावसायिक प्रशिक्षण : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळू शकते.कायदेशीर सल्ला : मंडळाकडून व्यापाऱ्यांना कायदेशीर सल्ला आणि मदत मिळू शकते.सामाजिक सुरक्षा : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.वृद्धापकाळात साहाय्य : व्यापाऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक साहाय्य आणि इतर सोयी-सुविधा मिळू शकतात.

व्यापाऱ्यांना सक्षम बनविणेतीन दशकांपेक्षा अधिक काळापासून देशांतर्गत व्यापार धोरण ठरविण्याची मागणी करत आहोत. त्याचा एक भाग म्हणजे ‘ व्यापारी कल्याण मंडळ’ होय. व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा यामागील उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात व्यापारी कल्याण मंडळाची स्थापना करावी. यासाठी सर्व व्यापारी संघटना मिळून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.- अजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्र