बसच्या प्रतीक्षेत उभा असलेल्या महिलेस ट्रॅक्टरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 14:15 IST2019-02-26T14:11:34+5:302019-02-26T14:15:47+5:30
कंपनीच्या बसच्या प्रतीक्षेत त्या रस्त्यावर उभा होत्या

बसच्या प्रतीक्षेत उभा असलेल्या महिलेस ट्रॅक्टरने चिरडले
औरंगाबाद : कामावर जाण्यासाठी कंपनीच्या बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभा असलेल्या एका महिलेस भरधाव ट्रॅक्टरने आज सकाळी ६. १५ वाजेच्या दरम्यान चिरडले. मीरा विद्यानंद इलग असे मृत महिलेचे नाव असून बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरासमोर ही घटना घडली.
बजाजनगर येथे राहणाऱ्या मीरा विद्यानंद इलग (27, रा. पास्टा, पो. शेवली जि. जालना ह.मु. बजाजनागर) या परिसरातील एका कंपनीत कामावर आहेत. आज सकाळीं ६ वाजेच्या दरम्यान त्या नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी जाण्यास घरून निघाल्या. मोहटादेवी मंदिरासमोर कंपनीच्या बसच्या थांब्यावर त्या उभा होत्या. याच दरम्यान एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने ( क्र. MH- 20, CY- 117 ) त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.