शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन राजधानी समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे,

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठणचे संतपीठ आणि वाळूज, शेंद्र्यासह आता होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे औद्योगिकनगरी म्हणून नावलौकिकास येत असलेले औरंगाबाद महानगर मात्र दर्जेदार मूलभूत सुविधांच्या अभावामुळे समस्यांच्या खोल-खोल गर्तेत रुतत चालले आहे. शहर धुरा वाहणारी महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. रस्ते खड्डेमय आहेत. पाण्याची समस्या गंभीर होत आहे. अतिक्रमणे वाढत आहेत. शहर सौंदर्यीकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. गुंठेवारी वसाहतीच्या समस्या वाढत आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेला १ हजार ५७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १३ लाख लोकसंख्येचा भार वाहण्यासाठी शहरात सार्वजनिक वाहुतकीची साधने नाहीत. शहर बससेवा नसल्यातच जमा आहे. शहराला किमान २०० नव्या बसगाड्यांची गरज असून, या गाड्या उपलब्ध करून देण्यास महामंडळ सक्षम नाही.शहरातील वाढती वाहतूक कमी करण्यासाठी शहराबाहेरून वळण मार्ग काढण्याची योजना वर्षानुवर्षे रखडलेली आहे. त्यात दररोज नवनवी वाहने रस्त्यावर येत आहेत. परजिल्ह्यातून होणारी अवजड वाहतूकही शहरातूनच होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या शहराकडे कामगार, कष्टकरी व नागरिकांचा असलेला ओढा पाहता, शहराची वाढ सुनियोजित करण्यासाठी महानगर प्रदेशाची घोषणा झाली. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकाही झाल्या. त्यानंतर महानगर प्रदेशचे घोडे कशात अडकले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मराठवाड्याचे आरोग्य बहुअंशी घाटी रुग्णालयावरच अवलंबून आहे. मराठवाड्यालगतच्या जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येथे येतात. घाटीला निधीची गरज आहे. शहरात महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय नाही. सिव्हिल हॉस्पिटलची उभारणीही धीम्यागतीने सुरू आहे. हे २०० खाटांचे रुग्णालय पूर्णत्वास येण्यासाठी फक्त १८ कोटींची गरज आहे. या प्रदेशाला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते; परंतु संतपीठाची घोषणा होऊन चाळीस वर्षे उलटली, तरीही संतपीठाचे काम पूर्णत्वास येत नाही. संतपीठाची इमारत उभी झाली; परंतु त्यातून अभ्यासक्रम सुरू व्हायला आणखी किती वर्षे लागतील, हे आज तरी सांगता येत नाही.