शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

तोरंबा येथे जबरी घरफोडी

By admin | Updated: August 31, 2015 13:46 IST

तालुक्यातील तोरंबा येथे चोरट्यांनी जबरी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला

 लोहारा : तालुक्यातील तोरंबा येथे चोरट्यांनी जबरी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरात झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर गुंगीची पावडर टाकून चोरी केली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोरंबा येथील जाफर अब्बास मुल्ला यांचे कुटुंबिय शनिवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुल्ला यांच्या घराबाहेर असलेल्या पाणी तापविण्याच्या वतलाच्या विटा काढून आतमध्ये प्रवेश केला. घरात झोपलेल्या सर्व नागरिकांच्या अंगावर गुंगीची पावडर टाकली. घरातील कपाटातील सोन्याचे एक नेकलेस, दोन कानातील रिंगा, एक बोरमाळ, मनी-मंगळसूत्र, लेडीज अंगठी, चांदीची चेन व रोख १0 हजार रूपये असा ६८ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना समोर येताच तोरंबासह परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोनि संतोष गायकवाड, सपोनि एस.एन.भिमाळे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या प्रकरणी जाफर मुल्ला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ए.आर.उंबरे हे करीत आहेत.(वार्ताहर)