आजचे राशिभविष्य दि. ३ डिसेंबर २०२० डॉ मनीषा देशपांडे औरंगाबाद

By | Updated: December 3, 2020 04:11 IST2020-12-03T04:11:39+5:302020-12-03T04:11:39+5:30

डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १२, १९४२. तिथी : कार्तिक ...

Today's horoscope December 3, 2020 Dr. Manisha Deshpande Aurangabad | आजचे राशिभविष्य दि. ३ डिसेंबर २०२० डॉ मनीषा देशपांडे औरंगाबाद

आजचे राशिभविष्य दि. ३ डिसेंबर २०२० डॉ मनीषा देशपांडे औरंगाबाद

डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२०

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १२, १९४२. तिथी : कार्तिक कृष्ण तृतिया. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर , नक्षत्र: सकाळी १२:२१ पर्यंत आर्द्रा. त्यानंतर पुनर्वसू. रास: मिथुन. आज: चांगला दिवस. संकष्ट चतुर्थी. राहू काळ: दुपारी १:३० ते ३ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा)

.........................................

मेष :

विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. बोलताना शब्द सांभाळून वापरा. वाद होऊ शकतो. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. काहींना व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. कोर्टाची कामे पुढे ढकलली जातील.

वृषभ :

प्रसिद्धी क्षेत्रातील लोकांची कामे होतील. त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतील. मुलांच्या प्रवेशाचे काम मनासारखे होईल. त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता राहणार नाही. घरात जोडीदाराचे म्हणणे ऐकावे लागेल.

मिथुन :

जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरीत तुम्ही तुमची छाप पाडू शकाल. व्यवसायात सरकारी नियमामुळे काही बंधने येतील. त्यातून बाहेर येण्याचा मार्ग देखील मिळेल.

कर्क :

दिवस मनासारखा सुरू होईल. परदेशी जाण्याचा विचार असेल किंवा तसा प्रयत्न करीत असाल तर त्यात प्रगती होईल. मुलांची प्रगती कळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील.

सिंह :

जुनी देणी पूर्ण करावी लागतील. आर्थिक अडचण निर्माण होईल. कोर्टात किंवा सरकारी कार्यालयात अडकलेली कामे मार्गी लागतील. दागिने किंवा सोन्याशी संबंधित व्यवसायात तेजी बघायला मिळेल.

कन्या :

नोकरी करणाऱ्यांना चांगला दिवस. नोकरीमध्ये प्रमोशनची वाट पाहत असाल तर आपले नाव यादीत समाविष्ट होईल, तसेच व्यवसायात कर्ज मंजुरीची वाट पाहत असाल तर हे काम होईल. महिलावर्गाला माहेरची मंडळी भेटल्यामुळे आनंद वाटेल.

तूळ :

सामाजिक कार्य करणाऱ्यांना कौतुकाची पावती मिळेल. काहींना सरकारी पुरस्कारही जाहीर होईल. बच्चेकंपनीला अभ्यास व परीक्षा यामुळे वैताग येईल. ज्येष्ठांना आवडते भोजन मिळेल.

वृश्चिक :

दिवस सामान्य जाईल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करा. घरात महिला वर्गात बाचाबाची होईल. संध्याकाळपर्यंत वाद निपटतील. काहींना बाळाच्या आगमनाची बातमी कळेल.

धनू :

न्यायालयाशी संबंधित लोकांना तब्येतीच्या तक्रारी राहतील. काहींना तपासणी करून घ्यावी लागेल. खेळाशी संबंधित लोकांना कडक नियमामुळे उपक्रम पुढे ढकलावे लागतील. बाकी दिवस सामान्य असेल.

मकर :

थंडी-सर्दी संबंधित तक्रारी चालू होतील. नोकरदार वर्गाला दिवस उदास व शांत जाईल. काहींचे शेजाऱ्यांशी वाद होतील. घरातील मोठ्यांचा सल्ला ऐका. लाभ होईल.

कुंभ :

नशीब साथ देणारा दिवस आहे. हाती असलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण होईल. काही मोहाचे क्षण येतील; पण त्याला बळी पडू नका. नाही तर छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान होऊ शकते.

मीन :

पूर्वी गुंतवलेल्या पैशावर चांगला फायदा होईल. जमीन किंवा फ्लॅट विकण्याचा विचार असेल तर प्रयत्न करा. लाभ मिळेल. थकवा जाणवेल. परस्पर नात्यातील वाद कमी होतील.

Web Title: Today's horoscope December 3, 2020 Dr. Manisha Deshpande Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.