आजचे राशीभविष्य दि. 2 डिसेंबर 2020 डॉ. मनीषा देशपांडे औरंगाबाद
By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:34+5:302020-12-02T04:11:34+5:30
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद बुधवार, दि. २ डिसेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ११ , १९४२. तिथी : ...

आजचे राशीभविष्य दि. 2 डिसेंबर 2020 डॉ. मनीषा देशपांडे औरंगाबाद
डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद
बुधवार, दि. २ डिसेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ११ , १९४२. तिथी : कार्तिक कृष्ण द्वितिया. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर, नक्षत्र: सकाळी १०:३८ पर्यंत मृग. त्यानंतर आर्द्रा. रास: मिथुन. आज: चांगला दिवस. राहू काळ: दुपारी १२ ते १:३० (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)
.........................................
मेष :
आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे काम करण्यात मन लागेल. काही सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. ज्यांच्या परीक्षा असतील त्यांना त्यात यश मिळेल. ऐनवेळी तुम्हाला होत असलेली घाई पूर्ण घराला डोक्यावर घेईल. मोठ्यांची बोलणी ऐकावी लागतील.
वृषभ :
बोलण्याशी संबंधित काम करणाऱ्यांना काम सोपे जाईल. लोकांना आपले म्हणणे नीट समजावता येईल. कलाकारांना पण चांगला दिवस राहील. नवीन कामे मिळतील. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.
मिथुन :
कामानिमित्त कोणाला विशेष भेटायचे असेल तर नक्की भेटा. काम लवकर होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलाखतीला जाताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. काही राहून जाणार नाही याची काळजी घ्या.
कर्क :
कलाकारांना त्यांची कला दाखविण्याची संधी मिळेल. काहींना यातून आर्थिक लाभदेखील होईल. एखाद्या कार्यक्रमात हजर राहण्याची संधी मिळेल. बरेच जवळचे नातेवाईक भेटतील.
सिंह :
मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. त्यांच्या मागण्या पूर्ण करताना तुमची दमछाक होईल. काही घरात मुलांची मंगल कार्य पण ठरू शकतील. एकूणच दिवस मुलाबाळांसाठी द्यावा लागेल.
कन्या :
नोकरीत कामाचा पूर्ण आनंद घेता येईल. तसेच व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. त्यामुळे खुश असाल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. काहींना दवाखान्यात जाण्याची वेळ येईल.
तुळ :
पाहुणे येतील. त्यामुळे आपली धावपळ होईल. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासात खाण्यापिण्याची, आरोग्याची काळजी घ्या. पायाला त्रास होण्याची शक्यता आहे. चालताना काळजी घ्या.
वृश्चिक :
व्यवसायात चोरीपासून सावधान. कोणीतरी चुकीच्या पद्धतीने तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करील. आर्थिक व्यवहार चांगले होतील. खाण्यापिण्याची चंगळ होईल. मनासारखे खाण्यास मिळेल. बच्चे कंपनी खुश राहील.
धनू :
घरातील सदस्यांच्या मनासारखे वागावे लागेल. ज्या घरात पाण्याचा प्रश्न त्रास देत आहे, तो सुटेल. घरातील इतर समस्या पण बऱ्या प्रकारे सुटतील. एकंदरीत ताण कमी करणारा दिवस आहे.
मकर :
तत्त्व व प्रयत्न त्यामुळे अपेक्षित यश मिळेल. शत्रूवर पण मात कराल. विरोधक तुम्हाला शरण येतील. भावासाठी वेळ द्यावा लागेल. मदत पण करण्याची गरज भासेल.
कुंभ :
तुमच्या छंदाचा उपयोग होईल. जवळच्या लोकांकडून कौतुक होईल. नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे अडकलेली कामे करता येतील. विशेषतः बँकेचे व्यवहार करा.
मीन :
घरातील सदस्य आनंदी असतील. त्यामुळे आपण आनंदी राहाल. पूर्वी केलेल्या मदतीचे फळ मिळेल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल.