पालक सचिवांकडून आज दुष्काळाची पाहणी
By Admin | Updated: November 16, 2014 23:37 IST2014-11-16T23:22:31+5:302014-11-16T23:37:42+5:30
बदनापूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार हे १७ नोव्हेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

पालक सचिवांकडून आज दुष्काळाची पाहणी
बदनापूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार हे १७ नोव्हेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
मागील काही कालावधीत गारपीट तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पालक सचिव राजेशकुमार हे धोपटेश्वर, रोषणगाव, बाजार वाहेगाव, वाकुळणी या गावांमधील पिकांची पाहणी करणार असल्याची माहिती तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी दिली. तत्पूर्वी राजेशकुमार हे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत ‘लोकमत’ ने दोन दिवसांपूर्वीच सविस्तर वृत्त प्रकाशित करून पिकांची गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली. यापूर्वी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविण्यात आलेल्या नजर आणेवारीमुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी सुधारित आणेवारीमध्ये सुधारणा करून या तालुक्यातील आणेवारी ३४ टक्के असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सुधारित आणेवारीमुळे पालक सचिव दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.