औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:43 IST2019-01-13T17:43:19+5:302019-01-13T17:43:47+5:30

पोंगल सणानिमित्त ट्रू जेटने विमान प्रवाशांसाठी २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान विशेष योजना जाहीर केली.

Tirupati air travel from Aurangabad in half-ticket | औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात

औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात

औरंगाबाद : पोंगल सणानिमित्त ट्रू जेटने विमान प्रवाशांसाठी २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान विशेष योजना जाहीर केली. औरंगाबाद-तिरुपती हवाई प्रवासासाठी इतर वेळी ९ ते ११ हजार रुपये मोजावे लागतात. या कालावधीत अवघ्या चार हजारांत प्रवास करता येणार आहे, तर औरंगाबाद-हैदराबादसाठी १ हजार ८९९ रुपये लागणार आहेत.


ट्रू जेटच्या स्टेशन मॅनेजर प्रतिमा थोटे यांनी सांगितले, पोंगल सणानिमित्त जाहीर केलेल्या या विशेष योजनेत औरंगाबाद ते हैदराबादसाठी १ हजार ८९९ रुपये, तर हैदराबाद ते तिरुपतीसाठी १ हजार ९९९ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे. यासाठी १९ जानेवारीपर्यंत बुकिंग करता येणार आहे, तर २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान प्रवास करता येईल.
औरंगाबादहून हैदराबाद आणि तिरुपतीला जाणाऱ्या प्रवासी आणि बालाजी भक्तांची मोठी संख्या आहे.

गेली काही वर्षे रेल्वे आणि अन्य वाहतूक सुविधांचा फक्त आधार होता. ट्रू जेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणाºया भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली. कंपनीकडून ७२ आसनी विमानाद्वारे सेवा दिली जात आहे.

 

Web Title: Tirupati air travel from Aurangabad in half-ticket