धक्कादायक ! पंचायत समितीमधील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:55 IST2021-01-19T19:54:38+5:302021-01-19T19:55:14+5:30

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी दि १८ रोजी बीडकीन ग्रामपंचायतीची अचानक तपासणी केली.

Tired of the trouble of the officer in the Panchayat Samiti, the Gram Sevak took poison | धक्कादायक ! पंचायत समितीमधील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने घेतले विष

धक्कादायक ! पंचायत समितीमधील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने घेतले विष

पैठण : पंचायत समितीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून  बीडकीन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसेवक शिंदे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले असून या प्रकरणावरून ग्रामसेवक संघटना संतप्त झाली आहे. पैठण पंचायत समिती प्रशासनात सुरू असलेली मनमानी व खपवून टाकण्याच्या दिलेल्या धमक्यांची चौकशी करण्यात यावी असा संतप्त सूर ग्रामसेवकातून आज समोर आला आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी दि १८ रोजी बीडकीन ग्रामपंचायतीची अचानक तपासणी केली. तेव्हापासून ग्रामसेवक संजय शिंदे हे तणावात दिसून आले होते. लगेच दुसऱ्या दिवशी संजय हरिभाऊ शिंदे यांनी  विष पिऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले  यामुळे ग्रामसेवक संतप्त झाले आहेत. पंचायत समिती प्रशासनाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवकांनी केली असून आज  रूग्णालयात जाऊन जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

Web Title: Tired of the trouble of the officer in the Panchayat Samiti, the Gram Sevak took poison