मारहाणीस कंटाळून विवाहितेने गळफास घेतला; आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:10 PM2021-05-12T17:10:21+5:302021-05-12T17:19:39+5:30

लग्नानंतर काही दिवसांनी तिचा पती  कृष्णा आणि तिचे सासू ,सासरे हे किरकोळ कारणावरून कल्पनासोबत भांडण करून तिला शिवीगाळ करून मारहाण करायचे.

Tired of being beaten, the married woman commit suicide; Husband arrested for inciting suicide | मारहाणीस कंटाळून विवाहितेने गळफास घेतला; आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

मारहाणीस कंटाळून विवाहितेने गळफास घेतला; आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे१० मे रोजी रात्री पतीने दारूच्या नशेत तिच्यासोबत भांडण केले होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण रात्री २ वाजता सोडविले होते.  दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कृष्णाने कल्पनाच्या आईला फोन केला आणि तो शिव्या देऊ लागला

औरंगाबाद: विवाहिता कल्पना हिला सतत मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मुकुंदवाडी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू सासऱ्याविरुध्द गुन्हा नोंदविला. याविषयी मयताच्या वडिलांची  तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी पती कृष्णा पारखे याला अटक केली.

मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जालिंदर संपतराव तेरे (रा.पाचोड, ता.पैठण) यांची  मुलगी  कल्‍पना आणि आरोपी कृष्णा(रा. जयभवानीनगर) सोबत २०१३ साली लग्न झाले. त्यांना ६ वर्ष आणि साडेतीन वर्षाची दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी तिचा पती  कृष्णा आणि तिचे सासू ,सासरे हे किरकोळ कारणावरून कल्पनासोबत भांडण करून तिला शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास ती मुलांकडे पाहुन सहन करायची. १० मे रोजी रात्री पतीने दारूच्या नशेत तिच्यासोबत भांडण केले होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण रात्री २ वाजता सोडविले होते.  


दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कृष्णाने कल्पनाच्या आईला  फोन केला आणि तो शिव्या देऊ लागला. तिच्या वडिलांनी फोन घेताच त्याने कल्पनाकडे फोन दिला. तेव्हा ती रडत होती. नवऱ्याने दारू पिऊन  तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले. तिचे सासू-सासर्‍यांनी तिला  शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तिने त्यांना सांगितले. तुम्ही औरंगाबादला लवकर  या, असे ती म्हणाली. ती फोनवर बोलत असतांना अचानक तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला. काही वेळाने कल्पना यांनी गळफास घेतल्याचे तिच्या शेजाऱ्यानी फोन करून त्यांना कळविले. या प्रकरणी तरे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात आरोपीविरूध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक कृष्णा  घायाळ तपास करीत आहेत.

Web Title: Tired of being beaten, the married woman commit suicide; Husband arrested for inciting suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.