शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

धिंड काढलेला गावगुंड टिप्या बिथरला; पुन्हा मकोका लागताच केला पोलिसांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:30 IST

कुख्यात गुन्हेगार टिप्यावर आतापर्यंत २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

छत्रपती संभाजीनगर : दोन वेळा मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. हा अपमान असह्य झाल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या गावगुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या मकसूद शेख याने पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केला. न्यायालयातील तारखेला हजर करून कारागृहात सोडताना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी त्याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका व्यापाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून अडीच लाख रुपये लुटले. आणखी अडीच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी टिप्यावर ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. जवळपास २ महिने इतरत्र पोबारा केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात टिप्या स्वत:हून न्यायालयात हजर झाला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी त्याला हर्सूल कारागृहात ताब्यात घेत अटक केली. त्यादरम्यान टिप्याची तो दादागिरी करीत असलेल्या परिसरात पहिल्यांदाच दोन वेळा धिंड काढली. हा अपमान असह्य झाल्याने त्याने त्याच वेळी स्वत:चे डाेके फोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.

पोलिस दिसताच संतुलन बिघडते१३ ऑक्टोबर रोजी एका गुन्ह्याच्या सुनावणी प्रकरणात पोलिस मुख्यालयातील उपनिरीक्षक कैलास जाधव यांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. काम आटोपून त्याला पुन्हा कारागृहात नेले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबवून त्याला कारागृहात नेत असताना त्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. जाण्यास नकार देत शिवीगाळ केली. माझ्यावर मकोका का लावला, असे हिंदीतून विचारत पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. कारागृहातून बाहेर आल्यावर सगळ्यांना पाहून घेईल, अशी धमकी दिली. कारागृह पोलिसांच्या मदतीने त्याला नियंत्रणात आणत आत नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी त्याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दुसऱ्यांदा मकोका, २८ गुन्हे दाखलटिप्यासह त्याच्या टोळीवर दोन वेळा मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा मकोका लावण्यात आला होता. मात्र, त्यात त्याला जामीन मिळाला. ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा पाेलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाईला परवानगी दिली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. टिप्यावर आतापर्यंत २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Infamous Goon 'Tipya' Attacks Police After MCOCA Reapplication

Web Summary : After public humiliation, notorious criminal Tipya attacked police while being escorted to jail. Facing fresh MCOCA charges and a history of 28 offenses, his aggression escalated, resulting in a new case filed against him.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी