भद्रा मारुती मंदिराच्या परिसरातील वानरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:36+5:302021-06-24T04:04:36+5:30
सुनील घोडके खुलताबाद : मागील चार महिन्यांपासून खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरातील वानरांवर उपासमारीची वेळ ...

भद्रा मारुती मंदिराच्या परिसरातील वानरांवर उपासमारीची वेळ
सुनील घोडके
खुलताबाद : मागील चार महिन्यांपासून खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरातील वानरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अन्नपाणी मिळावे म्हणून स्थानिक लोक भाविकांच्या मदतीने वानरांच्या पोटाची आग विझवितात किंवा भाविक स्वत:हून वानरांना खाऊ लागतात. मंदिर बंदचा फटका येथील वानरांवर बसला आहे. ना भाविक, ना स्थानिकांची मदत त्यामुळे मुक्या प्राण्यांची अन्नासाठी धडपड सुरू आहे.
खुलताबादचे भद्रा मारुतीचे जागृत देवस्थान असून मारुतीरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येते येतात. नियमित भाविकांची गर्दी कायम असते. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वानरांना केळी, खोबरे, शेंगदाणे, पेरू व इतर फळे भाविक भरवत असल्याने त्यांचा पोटाचा प्रश्न मार्गी लागलेला असतो. मंदिराच्या परिसरात सुमारे शंभर ते दीडशे वानरे आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भद्रा मारुती मंदिर मागील चार महिन्यांपासून बंद आहे. भाविक येत नसल्याने वानरांची उपासमार होत आहे. तर काही भाविक अधूनमधून मंदिराच्या परिसरात येऊन वानरांना खाऊ देतात. तर संस्थानचे कर्मचारी स्वखर्चाने या वानरांना शेंगदाणे, फुटाणे, केळी व अन्य फळे खाऊ घालतात. परंतु सुमारे शंभर ते दीडशे वानरांना अन्नपाणी वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वानरे अन्नपाण्याच्या शोधात खुलताबाद गावातील घरांकडे जात आहेत.
----
फोटो : खुलताबाद भद्रा मारुती मंदिर परिसरात बसलेले वानर.
230621\sunil gangadhar ghodke_img-20210623-wa0016_1.jpg
खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदिराच्या आवारात बसलेले वानर