शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:34 IST

औरंगजेब प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसापासून औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

- सुनील घोडकेखुलताबाद: औरंगजेब कबर प्रकरणावरून नागपूरात रात्री झालेल्या राड्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेब कबरीकडे येणारे रस्त्यावर पोलीसांनी बँरीकेट लावून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर दर्गेत कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही कसून चौकशी केली जात आहे. 

औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरीकेट लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री नागपूर येथे दोन समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. औरंगजेब कबर बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची चौकशी करण्यात येत असून त्यांचे नाव नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.

पर्यटकांची संख्या रोडावलीवेरूळ लेणी, खुलताबाद भद्रा मारूती येथे आलेले पर्यटक व भाविक औरंगजेब कबर बघण्यासाठी खास करून जात असत. पंरतू औरंगजेब प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसापासून औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. रविवारी ७०, सोमवारी ६०, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ पर्यटकांनी भेट दिल्याचे पोलीसांच्या नोंदवहीत माहिती नमूद आहे.

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण