शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

लोह्यात वादळीवारे, पाऊस

By admin | Updated: May 22, 2014 00:30 IST

लोहा : गत दोन दिवसांपासून वातावरणात बदलाचे संकेत जाणवत होते़ मंगळवारी दिवसभर उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त होते़ उकाड्यामुळे तर जीव कासावीस होत होता़

लोहा : गत दोन दिवसांपासून वातावरणात बदलाचे संकेत जाणवत होते़ मंगळवारी दिवसभर उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त होते़ उकाड्यामुळे तर जीव कासावीस होत होता़ मात्र सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण होवून सायंकाळी प्रचंड वादळी-वार्‍यासह पावसाने लोहा शहरासह परिसराला मोठा तडाखा दिला़ विद्युत पोल व झाडेू उन्मळून पडले़ तर विद्युत तारा तुटल्यामुळे २४ तासांपासून विद्युतपुरवठा खंडित झाला़ रात्री झालेल्या वादळी वार्‍यात जुन्या लोह्यातील ४५ वर्षीय इसमाच्या अंगावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला़ मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपीटीने हैदोस घालत शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल केले़ मंगळवारी लोह्याचा आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोह्यात आले़ मात्र सायंकाळी अचानक वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे व्यापार्‍यासह ग्राहकांची तारांबळ उडाली़ जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लोहा बसस्थानकात बस उभ्या होत्या़ अनेकांच्या घरावरील कौलारू, पत्रे उडून गेली़ त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पत्रे शोधण्यासाठी व्यत्यय निर्माण झाला़ घरावरील छतही गेले, त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी रात्र उघड्यावर काढली़ जुना लोह्यातील भोईगल्ली परिसरातील भगवान भिवाजी परडे (वय ४५) हे कामानिमित्त बाहेर गेले़ त्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वार्‍यात त्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्यांच्या डोक्यास मार लागला़ त्यांना उपचारार्थ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पहाटे त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मयताचा मुलगा संभाजी परडे यांच्या माहितीवरून लोहा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली़ मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍याने कंधार-लोहा मुख्य लाईनवरील इन्स्थुलेटर ब्रेक झाल्याने तसेच विद्युतपोल व तारांचे नुकसान झाल्याने लोहा शहर व माळाकोळी भागात नुकसान झाल्याने शहरातील वीजपुरवठा २४ तासापासून बंद आहे़ परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली़ शेतातील भुईमुग काम सुरू असून भुईमुगास पावसाचा मोठा फटका बसला़ (वार्ताहर) वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू नवीन नांदेड: शेतीचे कामे संपल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या एका ३२ वर्षीय तरूण शेतकर्‍याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना २० मेच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास मार्र्कं ड शिवारात घडली आहे. शिवाजी हारजी बोकारे असे मयताचे नाव आहे. २० मे रोजी दिवसभर ‘मार्र्कं ड’ शिवारातील त्यांच्या शेतीतील मशागतीचे सर्व कामे केली. शेतातील मोगडा संपल्यानंतर ते लिंबाच्या झाडाखाली बाजेवर झोपले. मंगळवारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजी बोकारे हे झोपेमध्ये असतानाच त्यांच्या अंगावर वीज पडली, यामध्येच ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. याप्रकरणी मुंजाजी हारजी बोकारे रा. मार्र्कं ड, यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवार दि. २१ मेच्या पहाटे आकस्मिक मुत्युची नोंद करण्यात आली.पो.हे.कॉ. प्रकाश कुंभारे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) शहर व परिसरात उखडून पडलेले विद्युत पोल व तुटलेल्या तारांचे दुरूस्ती काम वीज कर्मचारी व गुत्तेदारांकडून प्रगतीपथावर सुरू असून खंडित झालेला वीजपुरवठा काही तासात सुरळीत होईल - राम पराडकर (उपअभियंता, मराविम कं़ लोहा)