सिडकोच्या जलवाहिनीची गळती थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:00 IST2019-02-24T23:59:53+5:302019-02-25T00:00:12+5:30
सिडको जलवाहिनीची गळती थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

सिडकोच्या जलवाहिनीची गळती थांबेना
वाळूज महानगर : सिडको जलवाहिनीची गळती थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे सिडको वाळूज महानगर १ मध्ये पाहावयास मिळत आहे.
सिडको जलकुंभाकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती सुरूअसून, दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रोज बडस्, आर्चिड, सारा इलाईट व महावितरणकडे जाणाºया रस्त्यालगत जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या पाणीगळतीमुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेला डांबरी रस्ताही उखडला जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून सिडकोचे अधिकारी व कर्मचाºयांची ये-जा सुरूअसते. शनिवारी तर दिवसभर गळती सुरूअसल्याने रस्त्यावरून पाण्याचे अक्षरश: पाट वाहत होते. गळतीमुळे जलकुंभात पुरेसा जलसाठा होत नाही.
त्यामुळे नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. परिणामी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने महानगरातील अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, हंडाभर पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे मात्र सिडकोच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांमधून सिडको प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.