हनुमाननगरात सिमेंटचे तीन गुळगुळीत रस्ते
By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T01:03:50+5:302014-07-27T01:18:14+5:30
विकासाची गंगा...
हनुमाननगरात सिमेंटचे तीन गुळगुळीत रस्ते
औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४५, रहेमानिया कॉलनीतील खुल्या रंगमंचाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या या रंगमंचामुळे जिव्हेश्वर कॉलनीवासीयांची चांगली सोय होणार आहे.
बाजूलाच जिव्हेश्वर मंदिर असून मंदिराचे कार्यक्रम, शिवाय वेळोवेळीचे सणवार यापुढे या रंगमंचामुळे अत्यंत उत्साहात साजरे करणे सहज शक्य होणार आहे. अशी सोय उपलब्ध करून द्यावी ही या भागातील नागरिकांची मागणी विचारात घेऊन काम पूर्ण झाल्याबद्दल जिव्हेश्वर कॉलनीच्या स्त्री-पुरुषांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. राजेंद्र दर्डा यांनीच विविध निधींचा वापर करून जिव्हेश्वर कॉलनीत आतापर्यंत सिमेंट रस्ता, ड्रेनेजलाईन व खुले रंगमंच अशी कामे करून दिलेली आहेत. खुल्या रंगमंचाच्या लोकार्पणप्रसंगी जिव्हेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष खंडेराव भारूड, सुरेश लंगोटे, दिलीप शिवगण, पी.डी. पुंड, शरद लोकरे, अॅड. मधुकर देशपांडे, सुधाकर कुळकर्णी, मधुकांत कांबळे, भास्कर सरोदे तसेच बापूसाहेब वाळके व जे.यू. मिटकर यांच्यासह महिलांची मोठी उपस्थिती होती.
गुळगुळीत सिमेंट रस्ते
वॉर्ड क्र. ८३, पुंडलिकनगरातील हनुमाननगरात गल्ली नं. २ मधील कुंदन परदेशी यांची गल्ली व परेराव यांची गल्ली आता सिमेंट रस्त्यांमुळे चकाकत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतून हे रस्ते करण्यात आले. पूर्वी येथून पायी चालणे अशक्य व्हायचे. पावसाळ्यात पाणी साचायचे. वाहने जाऊ शकत नसत. लहान मुले पडायची. ही गैरसोय आता दूर होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि म्हणूनच राजेंद्र दर्डा यांचे आगमन झाले, तेव्हा फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी पंकज फुलपगर, राधाकृष्ण गायकवाड, कुंदन परदेशी यांच्यासह सा.बां.चे उपअभियंता ए.डी. घेवारे, शाखा अभियंता एस.बी. वाळवेकर तसेच ज्ञानेश्वर कटारे, कल्याण कावरे, दीपक परेराव, जगदीश दाभाडे, प्रशांत लाखे, दीपक वाघमारे, यमुना पांडे, लक्ष्मी लुटे, परदेशी काका, बंडू सोनवणे, लाखेकाका, गडप्पा, भाग्यवंत, दीपक चौहान, नखाते, भोसले, मनोज सोनवणे, बापू कवाळे, राऊत काकू, गाडेकर ताई, चव्हाण ताई, दाभाडे ताई, सुरासे ताई आदींची उपस्थिती होती.