भरधाव ट्रकच्या धडकेने तीनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:43 IST2019-01-08T22:42:56+5:302019-01-08T22:43:07+5:30
भरधाव ट्रकने जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप उलटून ३ जण जखमी झाले.

भरधाव ट्रकच्या धडकेने तीनजण जखमी
करमाड : भरधाव ट्रकने जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप उलटून ३ जण जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-जालना मार्गावर हसनाबादवाडी शिवारातील हॉटेल राजपूतसमोर रविवारी रात्री ९.३० वाजता घडली.
जालना तालुक्यातील बाजीउम्रद तांडा येथील १० भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी जीप (एम. एच.२१-सी ५८१९) ने गेले होते. तेथून गावाकडे परतताना हसनाबादवाडी शिवारात राजपूत हॉटेलसमोर रविवारी रात्री ९.३० वाजता जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने (सी. जी.०४-डी.बी.९४४४) जीपला पाठीमागून धडक दिली. यामुळे जीप उलटली. यावेळी झालेल्या अपघातात अंजू नेना पवार, अंजू रामलाल पवार, गोविंद गोबरा पवार हे गंभीर जखमी झाले. यावेळी जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. जीपचालक माधव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.