जिल्ह्यात तिघांनी संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: August 12, 2014 01:56 IST2014-08-12T00:46:19+5:302014-08-12T01:56:17+5:30
बीड : जिल्ह्यात मागील चोवीस तासांत वेगवेगळ्या कारणावरुन तिघांनी जीवनयात्रा संपविली. बीड शहरातील मोंढा

जिल्ह्यात तिघांनी संपविली जीवनयात्रा
बीड : जिल्ह्यात मागील चोवीस तासांत वेगवेगळ्या कारणावरुन तिघांनी जीवनयात्रा संपविली.
बीड शहरातील मोंढा परिसरात राहणाऱ्या राजू महोदव चांदणे (वय २८) याने जवळच्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दुसरी घटना शहारातीलच मोमीनपूरा भागात घडली. शेख असीम (वय २२) याने राहत्या घरीच आडूला गळफास घेतला. याशिवाय बीड तालुक्यातील कोळवाडी येथे एका २२ वर्षीय तरुणाने डोंगरावरील झाडाला गळफास लावून आपले जीवन संपविले. मयताची ओळख पटली चोवीस तास उलटूनही पटली नाही. ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी सांगितले.
जावयाची आत्महत्या
माहेरी असलेल्या पत्नीला नांदविण्यास पाठविले तर नाहीच शिवाय सासुरवाडीतील लोकांनी मारहाण केली़ त्यामुळे जावयाने स्वत:च्या घरी येऊन आत्महत्या केली़ ही घटना रविवारी कुरणपिंप्रीत रविवारी घडली़ शेख शफिक शेख गफूर (वय ३० रा़ कुरणपिंप्री ता़ गेवराई) असे मयताचे नाव आहे़ त्यांची सासुरवाडी गावातच आहे़ पत्नी सुमैया हिला आणण्यासाठी ते सासुरवाडीत गेले़ त्यांच्यासोबत सुमैयाला पाठविले नाही़ त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले़