छावणी, मुकुंदवाडीत तीन लाखांची आॅनलाईन फसवणूक

By Admin | Updated: September 11, 2016 01:23 IST2016-09-11T01:19:46+5:302016-09-11T01:23:11+5:30

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

Three lacs of online fraud in the camp, Mukundwadi | छावणी, मुकुंदवाडीत तीन लाखांची आॅनलाईन फसवणूक

छावणी, मुकुंदवाडीत तीन लाखांची आॅनलाईन फसवणूक

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. छावणीमध्ये राहणाऱ्या वरिष्ठ आयकर अधिकारी महिलेच्या ई-मेलवरून बँकेला मेल पाठवून त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ४५ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. तर मुकुंदवाडी भागात आईचे एटीएम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या मुलास मदत करण्याचा बहाणा करून एका भामट्याने हातचलाखीने चक्क कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून १ लाख ८५ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. याप्रकरणी अनुक्रमे छावणी आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१ लाख ८५ हजारांचा गंडा...
मुकुंदवाडी येथील भागात एक महिला तिच्या मुलाबाळांसह राहते. त्यांचा १३ वर्षांचा सोहम (नाव बदलेले आहे) हा बऱ्याचदा आईचे एटीएम कार्ड नेऊन एटीएम सेंटरमधून पैसे काढून आणत असतो. मुकुंदवाडीतील भाजीमंडई येथे स्टेट बँक आॅफ हैदराबादचे एटीएम सेंटर आहे. ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास या एटीएम सेंटरमधून मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी सोहम आईचे एटीएम कार्ड घेऊन गेला. यावेळी एटीएम सेंटरमध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी तो उभा राहिला असता त्याच्यामागे एक तरुण उभा होता. यावेळी मिनी स्टेटमेंट निघत नव्हते. हे पाहून मागे उभा असलेल्या तरुणाने त्यास तुला मी मिनी स्टेटमेंट काढून देतो, असे सांगून त्याच्याकडून एटीएम कार्ड घेतले. यावेळी त्याने मशीनमध्ये कार्ड स्वॅब केल्यानंतर सोहमला पासवर्ड विचारला. आपल्याला मदत करण्याचा बहाणा करणारा भामटा आपली फसवणूक करण्याचे षड्यंत्र रचत आहे, याबाबत सोहमच्या मनात किंचित शंकाही आली नव्हती. त्यामुळे त्याने निरागसपणे त्यास पासवर्डही सांगितला. पासवर्ड टाकून आरोपीने मिनी स्टेटमेंट सोहमला काढून दिले. यावेळी मात्र आरोपीने हातचलाखी करून सोहमचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून त्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड त्याच्या हातात दिले. आरोपीने दिलेले एटीएम कार्ड आणि मिनी स्टेटमेंट घेऊन सोहम घरी गेला. त्यानंतर त्या भामट्याने बालकाकडून मिळविलेल्या एटीएम कार्ड आणि पासवर्डचा वापर करून रोख १ लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. माहिती मिळताच माय-लेकरांनी मुकुंदवाडी ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Web Title: Three lacs of online fraud in the camp, Mukundwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.