शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढणाऱ्या तीन रोमियोंना पकडले

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

मंठा : येथील बसस्थानकात मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंवर पाळत ठेवून महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने तीन रोमियोंना पकडून त्यांची सिनेस्टाईल धुलाई केली.

मंठा : येथील बसस्थानकात मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंवर पाळत ठेवून महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने तीन रोमियोंना पकडून त्यांची सिनेस्टाईल धुलाई केली. दोन मुलींना पळवून नेण्यात येत असल्याचे वृत्त्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.शहरात पहिल्यांदाच रोमियोंविरुद्ध धडक कारवाई झाल्याने पालकांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. २३ जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर कर्नावळ या आपल्या गावी जाणाऱ्या दोन मुलींना आॅटोरिक्षातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मुलींनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला. त्या मुलींना ‘लोकमत’ च्या टीमने कर्नावळ या गावी नेऊन सोडले. यामध्ये सदर मुली जखमी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ द्वारे प्रकाशित होताच पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी महिला पोलिसांचे दामिनी पथक मंठा येथे पाठवून छेडछाड करणाऱ्या रोमियोंचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले. मंठा येथील बसस्थानक परिसरात राहुल मधुकर शिंदे (वय २४, रा. पांगरी खुर्द, ता. मंठा), ज्ञानोबा श्रीरंग खरात (वय १९, रा. खोराडसावंगी, ता. मंठा) सिद्धार्थ सखाराम घुगे (वय २६, रा. मेसखेडा, ता. मंठा) हे मुलींची छेड काढताना आढळून आले.त्याच क्षणी दामिनी पथकातील सदस्यांनी या तिन्ही रोमियोंना पकडून चोप दिला व त्यांना मंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वाय.एस. शेख यांनी संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. अनंत कुलकर्णी, पो.नि. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख कमल गिरी त्यांच्या सहकारी वंदना मस्के, संजीवनी गाढे, सीमा देठे, सुरेखा जाधव, मेघा नागनोत, माधुरी फुके व चालक सुरेश पाटील यांनी केली. दरम्यान, मंठा शहर व परिसरातील छेडछाडीचे प्रकार होत असल्यास पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)