शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटी, कुर्ला, दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी; एकजण औरंगाबादमधून ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:41 IST

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर मंगळवारी रात्री एकाने फोन करून तीन रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली

वाळूज महानगर (औरंगाबाद) :  मुंबई शहरात बॉम्ब हल्ले करण्याची धमकी देणाऱ्या एकास मंगळवारी मध्यरात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रांजणगावात जेरबंद केले. पंजाब शिवानंद थोरवे (३३, रा.रांजणगाव) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. विक्षिप्त स्वभाव व दारुच्या नशेत त्याने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर मंगळवार (दि.५) रात्री ९.५० वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने ७८२०९०२२५६ या क्रमांकावरुन फोन करुन मुंबईच्या कुर्ला, दादर, सीएसटी या ठिकाणी बॉम्ब हल्ले करणार असल्याची धमकी दिली. बॉम्ब हल्ले करण्यासाठी हल्लेखोर घोडबंदर गुजरात मार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती देखील त्याने नियंत्रण कक्षाला दिली. यामुळे सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फोन करणाऱ्याचा शोध घेतला. तो औरंगाबादेतील वाळूजमध्ये आढळला. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.युसुफ शेख, पोकॉ.सागर यांनी रांजणगावात शोध घेतला. परंतु, त्याचा मोबाईल बंद आढळून आला. त्यानंतर मुंबई रेल्वे गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तत्काळ दुसरा क्रमांक शोधला. त्यावर संपर्क केला रामेश्वर बागडे याने धमकी देणाऱ्या मोबाईल वापरकर्त्याचे नाव पंजाब शिवानंद थोरवे असे असून तो महिनाभरापूर्वी आपल्याकडे कामाला असल्याचे सांगत रांजणगावात वास्तव्यास असल्याची माहिती दिली. ओळख पटताच पोलिस पथकाने रामेश्वर बागडे यास सोबत घेऊन रात्री उशिरा पंजाब शिवानंद थोरवेस (३३) रांजणगावातून ताब्यात घेतले.

दारुचे व्यसन व नैराश्यातून केले कृत्यआरोपी पंजाब थोरवे हा मुळचा डोळेपांघरा, ता.लोणार, जि.बुलढाणा) येथील रहिवाशी असून त्याला मद्याचे व्यसन असून वाहनचालक म्हणून त्याने काही दिवस काम केले आहे. मात्र चोरी केल्याने त्यास कामावरुन काढून टाकले होते. वर्षभरापूर्वी पंजाब थोरवेने पत्नी व मेव्हणीचे अश्लिल फोटो समाजमाध्यांमावर व्हायरल केले होते. या प्रकरणी त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्याच्या विक्षिप्त स्वाभावमुळे पत्नीही त्याच्याजवळ रहात नाही. विक्षिप्त स्वभावाच्या पंजाब थोरवे याने नैराश्य व दारुच्या नशेत मुंबईत बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या धमकी प्रकरणी आरोपी पंजाब थोरवे विरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDadar Stationदादर स्थानकKurlaकुर्लाMumbaiमुंबई