शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीसाठी चोरट्यांनी केले शेतकरी अपहरण

By admin | Updated: August 31, 2015 17:25 IST

शेतात शेतकरी जात असताना तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध केले आणि दुसर्‍या शेतकर्‍यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली.

श्यामकुमार पुरे■ सिल्लोड (जि. औरंगाबाद)
रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन शेतात जात असलेल्या शेतकर्‍याला तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध केले आणि त्याच्या डब्यात तिघांचे पोट भरले नाही म्हणून दुसर्‍या शेतकर्‍यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली. सिल्लोड तालुक्यातील घटांब्री शिवारातील या घटनेने खळबळ उडाली आहे. 
घटांब्री येथील सुदाम रंगनाथ सुरडकर डबा घेऊन आपल्या शेतात जात असताना, तीन चोरट्यांनी आम्हाला भूक लागली आहे, तुझा डबा दे व तुझ्या मित्रांचे डबे मागव' आम्ही तुला काही करणार नाही, अशी धमकी दिली. मात्र घाबरलेला सुरडकर आरडाओरड करणार हे पाहून चोरट्यांनी त्याच्या तोंडाला रुमाल लावला. यामुळे तो बेशुद्ध झाला. शुद्ध आली तेव्हा शेतापासून दूर डोंगराच्या पलीकडे आमखेड्याच्या धरणाजवळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी तिघे चोरटे त्यांच्याजवळच होते. त्यांनी डबाही खाल्ला होता. एका डब्यात पोट भरले नाही म्हणून त्यांनी दुसर्‍या शेतकर्‍यांना डबा मागव म्हणून धमकावले. त्यावर सुदामने फोन केला. त्याने चोरट्यांनी मला पळविल्याचे सांगून त्यांना जेवणाचा डबा आणून दिला तर ते मला सोडतील, असे सांगितले. त्यावर एका चोरट्याने फोन घेऊन भूक लगी हैं, तुम्हारे डबे लेकर आओ, तब इसे छोड देंगे, हम इधर तालाब के पास थोडा पाणी हैं वहा हैं, असे सांगितले.
कोम्बिंग ऑपरेशन सुरू - पोलीस अधीक्षक
याबाबत औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले, तपासासाठी पोलीस पथक घटांब्री परिसरात पाठविण्यात आले आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. ते कुणीही असो त्यांचा शोध लवकरच लावण्यात येईल.
शिकारी असतील - सहायक निरीक्षक
चोरटे ओळख लपवितात. यांनी मात्र तसे काही केल्याचे दिसून येत नाही. ते कदाचित शिकारीही असतील. त्यांना भूक लागली असेल म्हणून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले. संधी साधून काढला पळ पाणी पिण्यासाठी चोरटे धरणाजवळ गेले असताना सुदाम यांनी तेथून धूम ठोकली. बेशुद्ध केल्यावर सुदामला आमखोरा धरणाजवळ कसे नेले हे मात्र समजू शकले नाही.
--------------
सिल्लोड तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांची एक टोळी घुसल्याची माहिती अजिंठा पोलिसांनी दवंडी देऊन गावागावात दिली होती. नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. भूक लागली म्हणून त्यांनी शेतकर्‍याला वेठीस धरले असेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.