साठ कोटींवर मावेजा वाटप
By Admin | Updated: August 26, 2014 00:26 IST2014-08-26T00:26:48+5:302014-08-26T00:26:48+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ९ च्या चौपदरी करणासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २७ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून

साठ कोटींवर मावेजा वाटप
उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ९ च्या चौपदरी करणासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २७ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून संबधित शेतकऱ्यांना आतापर्यंत भूसंपादन मांजरा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ६० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र ९ ( नवीन ६५) हा तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्यातील अनुक्रमे ११,२ व १४ या प्रमाणे २७ गावातून जात असून या गावातील २७८.६७ हेक्टर क्षेत्र संपादन करुन भुसंपादनाची प्रकिया पूर्ण करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ चे कलम ३ जी प्रमाणे निवडी ही अंतिम करण्यात आली आहे. २६ गावांचा निधीप्राप्त असून त्यापैकी २४ गावातील संपादित क्षेत्राचा मोबदला वाटप करण्यात आलेला आहे.उर्वरित दोन गावातील मोबदला वाटपाची कार्यवाही सुरु आहे. तसेच निधी वाटप करण्यात आलेल्या २४ पैकी २१ गावातील संपादित क्षेत्राचा ताबा घेण्यात आला आहे.
यात धाकटीवाडी, थोरलीवाडी, येळी, रामपूर, भोसगा, मुर्टा, बाभळगांव, खानापूर, जगदाळवाडी, तलमोड, कराळी, तुरोरी, आलियाबाद, मुळज, महालिंगरायवाडी, दस्तापूर, जळकोट, केरुर, येणेगुर, दाळीब, अणदूर, धनगरवाडी, फुलवाडी, ईटकळ, उमरगा ग्रा, नळदुर्ग जकेकुर असे तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्यातील २७ गावांचा समावेश आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग सरकार यांचे नावे सातबारा उताऱ्यावर नोंदी करण्यात आल्या असून तीन गावातील मोबदला वाटपाची कार्यवाही सुरु असल्याची माहिती मांजरा भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी दिली. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊसाठी खानापूर ते जगदाळवाडी २६९/८०० ते ३४८ / ८०० किलो मीटर पर्यंत आहे. यासाठी तुळजापूर तालुक्यातील ११ गावे, उमरगा १४ तर लोहारा मधील २ असे २७ गावातील जमीन संपादित करण्यात आल्या आहेत. याचे एकूण क्षेत्र हे २७८ हेक्टर ७६ आर असल्याचे भूसंपासन मांजरा प्रकल्पाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच गावातील संपादीत क्षेत्राचा ताबा महसुल यंत्रणेने घेतला असून, तो राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचेही ते म्हणाले.