शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांचे कुलदैवत काळभैरव

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

मोहनदास साखरे ,मांडवा बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या काळभैरवाची यात्रा दत्त जयंतीनिमित्त भरते.

मोहनदास साखरे ,मांडवाबीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या काळभैरवाची यात्रा दत्त जयंतीनिमित्त भरते. हा उत्सव तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा. परळी तालुक्यातील मांडवा येथे काळभैरव देवस्थान आहे. या देवस्थानची यात्रा डिसेंबर महिन्यात व दत्त जयंतीनिमित्त पौर्णिमेला भरते. हा उत्सव तीन दिवस चालतो. यामध्ये कीर्तन, भजन, गायन यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे भाविकांसह या कार्यक्रमांनी परिसर फुलून जातो.घाटनांदूर येथील प्रभू सोमेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगातून उगम पावलेल्या बोरणा नदीच्या काठावर व वटवृक्षाच्या मुळाशी अतिप्राचीन असे भगवान काळभैरव देवस्थान आहे. लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. पूर्वेला मंदिराचा दरवाजा आहे. काळभैरव व नरुबा एकत्र बसलेले आहेत. गाभाऱ्यात त्यांच्या स्वतंत्र मूर्ती असून, नवसाला पावणारा काळभैरव अशी याची आख्यायिका आहे. दररोज येथे जिल्ह्यातील शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.आंध्रप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. विविध ठिकाणाहून ेयेथे दिंड्या येतात. यात्रेच्या दिवशी काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक निघते. तीन दिवस संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने व कार्यक्रमांच्या रेलचेलीने गजबजून गेलेला असतो. याठिकाणी चोख बंदोबस्तही ठेवलेला असतो.