शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांविषयक गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST

उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़

 उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़ चालू वर्षी चार महिन्यातील महिला विरोधी गुन्हेगारीची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे़ या कालावधीत एकीचा हुंड्यासाठी खून झाला असून, ११ विवाहितांनी जीवनयात्रा संपविली आहे़ तर १३ जणी बलात्कारासारख्या क्रूरकृत्याच्या बळी ठरल्या आहेत़ जाचाचे ४८ तर विनयभंगाचे ३९ गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद आहेत़ स्पर्धेच्या युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध योजनांसह आरक्षणही लागू करण्यात आले आहे़ मात्र, धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या युगात शहरासह ग्रामीण भागातील महिला, युवती खर्‍याच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न समोर येत आहे़ जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारी नोंद रजिस्टरमध्ये महिलांच्या आलेल्या तक्रारी आणि गुन्ह्यांचे प्रकार पाहता स्पर्धेच्या युगात शिक्षितच अज्ञानी आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो़ जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीत हुंड्यासाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी खून केला आहे़ दोघींचा हुंड्यासाठी बळी गेला आहे़ ११ जणींनी जाचास कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे़ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत़ तर १३ युवती, महिला या बलात्कारासारख्या नीच कृत्याच्या शिकार ठरल्या आहेत़ तब्बल ४८ विवाहितांनी जाचप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत़ काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर रस्त्यावर, शेतात, नव्हे स्वत:च्या घरात सुरक्षित असतानाही जिल्ह्यातील ३९ जणींचा काही महाभागांनी विनयभंग केला आहे़ तर छेडछाड प्रकरणी एक गुन्हा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी) कारणांचा शोध आवश्यक महिला, मुलींवरील वाढलेले अत्याचार, जाचहट, हुंडाबळी आदींची मुख्य कारणे शोधण्याची वेळ आली आहे़ आरक्षण, कायदे लागू करूनही याघटनांची तीव्रता कमी होताना दिसत नाही़ त्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी व विक्रत लोकांवर कठोर कारवाईसाठी कारणांचा शोध घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे़ तक्रार निवारण केंद्राची मदत पोलिस दलांतर्गत विवाहित दाम्पत्यात झालेली भांडणे सोडविण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे़ गत अनेक वर्षापासून या महिला तक्रार निवारण केंद्रातून अनेकांचे संसार पुन्हा फुलले आहेत़ मात्र, तडजोडीत ज्यांचे जमतच नाही त्यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ फिरते पथक कार्यरत युवती, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी विविध प्रकार रोखण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले आहे़ उस्मानाबाद येथील या पथकाने वारंवार रोडरोमिओंसह इतर टवाळखोरांवर कारवाई करून वचक निर्माण केला आहे़ मात्र, अनेकांना कायद्याची आणि कारवाईची भिती नसल्याने या घटना सुरूच असल्याचे चित्र आहे़ सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी, समाजात पाश्चात संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण होत आहे़ पूर्वीप्रमाणे एकत्रित कुटुंब पध्दती कमी प्रमाणात आहे़ भौतिक सुखसुविधांचा मोह वाढत आहे़ मूल्यांवर समाधान मानणारे कमी प्रमाणात असल्याने अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. जुन्या मूल्यांची जपणूक करून एकमेकांच्या अडचणी चर्चेतून सोडविल्यानंतर अत्याचाराच्या घटना कमी होतील, अशी आशा मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी दिली़