शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार शिक्षकांचे वेतन कापणार

By admin | Updated: July 16, 2014 01:30 IST

वाळूज महानगर : जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोडून वेतन आणण्यासाठी गेलेल्या चार शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.

वाळूज महानगर : जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोडून वेतन आणण्यासाठी गेलेल्या चार शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद शाळेत १४ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास तिसरीची विद्यार्थिनी प्रियंका इंगोले खेळताना पडून बेशुद्ध पडली होती. या शाळेतील शिक्षक गायत्री परदेशी, बेबी तायडे, प्रमोद घोरपडे व एन. एस. बेग शाळेच्या वेळेत पंढरपूरला बँकेतून वेतन आणण्यासाठी गेले होते. पदाधिकाऱ्यांना समजलेहोते. शाळेतील २३ शिक्षकांपैकी एकाच वेळी ९ शिक्षक गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेले सरपंच योगेश दळवी, काकासाहेब दुबिले, संजय दुबिले, उत्तम मुळे, गणेश साबळे, नारायण काजळे, भास्कर दुबिले व गजानन भालेराव यांनी शाळेत येऊन पंचनामा केला होता.चौघांचे वेतन कपातशाळेत शिक्षक गैरहजर असल्याची माहिती आज वर्तमानपत्रांतून मिळताच गंगापूरचे गटशिक्षणाधिकारी निवृत्ती घोडके यांनी वाळूजचे केंद्रप्रमुख देवीदास सूर्यवंशी यांना शाळेत चौकशीसाठी पाठविले. योगेश दळवी, पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पा. पेरे व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोषी शिक्षकांवर कारवाई करावी; अन्यथा १६ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. सूर्यवंशी यांनी गायत्री परदेशी, बेबी तायडे, मंगल पाटील व एन.एस. बेग यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित शिक्षकांना वर्तन सुधारण्याची कडक ताकीद देण्यात आली आहे.शिक्षकांनी वेळेवर शाळेत हजर राहावे यासाठी आज ग्रामपंचायतीने त्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविले. शाळेत शिक्षक कसे शिकवतात यावर देखरेखीसाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सरपंच योगेश दळवी यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच नजीर खान पठाण, सदस्य प्रकाश वाघचौरे, डॉ. ज्ञानेश्वर पा. नीळ उपस्थित होते.