शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्यांदा पेरणीची वेळ

By admin | Updated: July 12, 2014 00:36 IST

गोकुळ भवरे, किनवट जून महिन्यातील ठोक पावसानंतर केलेली पूर्ण पेरणी वाया गेली़ लगेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़

गोकुळ भवरे, किनवटजून महिन्यातील ठोक पावसानंतर केलेली पूर्ण पेरणी वाया गेली़ लगेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ त्यानंतरच्या जेमतेम पावसामुळे काही प्रमाणात उगवलेली अंकुरेसुद्धा ४५ डिग्री तापमानाने होरपळून गेली़ त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यावर तिबार पेरण्यांचे संकट आले आहे.तालुक्यात जवळपास ६३ हजार हेक्टरमध्ये जून महिन्यातच पेरण्या पूर्ण झाल्या़ तालुक्यात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड होते़ मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एका ठोक पावसामुळे येथे धूळपेरणी करण्याची प्रथा अधिक असल्याने सर्वच क्षेत्रात दुसरा पाऊस झाला असता तर ही पेरणी जमेची बाजू झाली असती, परंतु तसे न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होेते़ त्यांनी बिनबोभाट दुबार पेरण्या करूनही टाकल्या़ परंतु उन्हाळ्याप्रमाणे तापमान झाल्याने पेरणीसुद्धा वाया गेली़ आता तिबार पेरणीसाठी बियाणे आणायचे तरी कशाने व कोठून? या विवंचनेत संपूर्ण शेतीवर्ग सापडला आहे़ त्यातूनच काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या़ मंत्र्यांनी स्थानिक प्रशासनास पंचनामे करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे कळविले़ तसे दुबार पेरणीच्या नुकसानीचे पाहणी पत्रके वरिष्ठांना पाठविले़ नुकसानीचे आकडे बघून जिल्हास्तरीय बागायती लोकप्रतिनिधींना किनवटचा द्वेश आला की काय, अशा स्थितीत नुकसानीच्या पाहणीपत्रकाचे दुसऱ्या यंत्रणेमार्फत फेरतपासणी करण्याचे निर्देश दिल्या गेले़ त्यामुळे शेतकरी मात्र याकडे मोडीत मदतीपासून दुरावला गेला आहे़ परिणामी तिबार पेरणी लांबण्याची चिन्हे दिसत आहे़ संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी पीककर्ज माफ करून नव्याने पीककर्ज उपलब्ध करण्याची मागणी होत आहे़ मानवतावादी संघटन समितीने ५ जुलै रोजी तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले़ त्यानंतर ८ जुलै रोजी भाजपाकडून धरणे आंदोलन करण्यात आले़ तिबार पेरणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत व पीककर्ज संपूर्ण माफ करून नव्याने पीककर्जाचे वितरण, जनावरांसाठी चाराडेपो, पिण्याच्या पाण्याची नव्याने यंत्रणा उभारणे या विषयांना घेऊन माकपचे कॉ़अर्जुन आडे, भारिप बमसंचे सुरेश जाधव, संविधान पार्टीचे मिलिंद धावारे, शिवसेनेचे सुरज सातुरवार, सुनील पाटील, भाकपाचे गंगारेड्डी बैनमवार यांच्यासह सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल, असे वातावरण सध्या होत आहे़पहिल्या पेरणीपोटी हेक्टरी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, दुबार पेरणीसाठी ४ हजार रुपये असा एकूण ९ हजार रुपये खर्च केला़ तो वाया गेला़ आता तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही़ तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या अस्मानी संकटातून गतवर्षी अतिवृष्टी व गारपीट आणि यावर्षी कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे़ याविषयी शासनास पूर्वकल्पना दिली़ त्यातूनच नुकसानीची पाहणी सुरू आहे़ यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आ़ प्रदीप नाईक यांनी दिली़ पावसासाठी कंधारात विठोबाला साकडे कंधार: पावसाअभावी शेतकरी, नागरिकांच्या मनाची मोठी घालमेल चालू आहे. त्यामुळे पाणी पडू दे अन् शिवार फुलू दे असे भाविकांनी शहर व परिसरात विठूरायाला साकडे घालत पूजाअर्चा केली. भर पावसात आषाढी एकादशी साजरी करण्याची मनोकामना भाविकांनी बाळगली होती. हिरवा शिवार, पावसाची रिमझिम, रस्त्यावर चिखल, शेतात पिकांची मशागत करतानाचे चित्र, गुराढोरांना मिळणारे हिरवे गवत, बाजारात शेतकऱ्यांची गर्दी आदी चित्र लोप पावले आहे. आकाशाकडे पाहून पाणी पडण्याच्या आशेने शेतकरी व्याकुळ झाला आहे. एकीकडे पेरण्यासाठी झालेली बी-बियाणांची व रासायनिक खताची खरेदी, त्यातच मुला-मुलींना लागणारे शैक्षणिक साहित्य खरेदी आदीने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. ८ जुलै रोजी हलक्या पावसाने हजेरी लावली. कंधार १८, कुरुळा ८, उस्माननगर ४०, पेठवडज १८, फुलवळ १ व बारुळ निरंक अशी नोंद झाली. पेरणीयोग्य पावसाची हजेरी नसल्याने आभाळाकडे शेतकरी टक लावून थकला आहे. निसर्गाला साद घालून चिंतित झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगालाच आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत पावसासाठी साकडे घातले. पूजाअर्चा, भजन, कीर्तन, मृदंग, टाळाच्या गजरात विठ्ठलाच्या जयघोषात भाविकांनी आराधना केली. बालगोपाल, स्त्री-पुरुष, अबालवृद्ध आदींनी शहरात माणिकगडावरील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)