मॅनहोलमध्ये गुदमरलेल्या तिसऱ्या शेतकऱ्याचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:58 IST2019-03-19T22:58:24+5:302019-03-19T22:58:53+5:30
सुखना नदीपात्रातील ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलमधून मोटारीने पाणी उपसा करण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू, तर अन्य चौघे अत्यवस्थ झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी उमेश कावडे (२८, रा. चिकलठाणा) यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. रामकिशन माने व प्रकाश वाघमारे यांची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे

मॅनहोलमध्ये गुदमरलेल्या तिसऱ्या शेतकऱ्याचे निधन
औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलमधून मोटारीने पाणी उपसा करण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू, तर अन्य चौघे अत्यवस्थ झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी उमेश कावडे (२८, रा. चिकलठाणा) यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. रामकिशन माने व प्रकाश वाघमारे यांची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे. ड्रेनेजलाईनमध्ये बेपत्ता असलेल्या रामेश्वर डांबे यांचा दुसºया दिवशीही शोध लागला नाही.
ब्रिजवाडी पॉवरलूम येथील कब्रस्थानानजीकच्या सुखना नदीपात्रातून वाहणाºया भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये उतरून त्यातून शेतीसाठी पाणी घेण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकºयांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अत्यवस्थ असलेल्या चौघांपैकी उपचार सुरू असताना उमेश कावडे यांचे मंगळवारी निधन झाले. नवनाथ कावडे यांच्या प्रकृतीवरील धोका टळला असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रकाश वाघमारे व रामकिसन माने यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनार्दन साबळे, दिनेश दराखे हे सोमवारी घटनास्थळीच मृत पावले होते.
सासºयाला वाचविताना बेपत्ता झालेल्या
जावयाचा शोध सुरूच
रामकिसन माने यांचे जावई रामेश्वर डांभे हे सासºयांना वाचविण्यासाठी चेम्बरमध्ये उतरले होते. ते कालपासून बेपत्ता असून, ते चेम्बरमधून वाहून गेले असावेत, अशी शक्यता आहे. मंगळवारी दुसºया दिवशीही रामेश्वर डांभेंच्या शोधार्थ अग्निशामक विभाग व मनपाची पथके कार्यरत होती. मंगळवारी रात्रीपर्यंत यंत्रणेला यश आलेले नाही.
मोबाईल लोकेशन घेण्याची मागणी
डांभेंच्या नातेवाईकांनी मोबाईलच्या लोकेशनवरून शोध घेण्याची विनंतीही पथकाकडे केली. घटनास्थळापासून तीन ठिकाणी पथकाने चेम्बर फोडण्याचा प्रयत्न केला. रखरखत्या उन्हातही अग्निशामक विभागाचे राजू सुरे व त्यांच्या कर्मचाºयांचे शोधकार्य सुरूच होते.
धुळ्याहून आले पथक
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे २७ जवानांचे पथक धुळ्याहून मंगळवारी सायंकाळी शहरात दाखल झाले असून, त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.