शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तेर ग्रामस्थांना टंचाईच्या झळा

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

तेर : पावसाने ओढ दिल्याने तेर (ता़ उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़

तेर : पावसाने ओढ दिल्याने तेर (ता़ उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ त्यात जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडल्याने अर्ध्याहून अधिक ग्रामस्थांना येणारे पाणीही मुबलक प्रमाणात मिळत नाही़ शिवाय येथील झोपडपट्टी भाग व पेठ परिसरातील गोदावरी भागात पाणीटंचाई भीषण झाली आहे़येथून नजीकच असलेल्या तेरणा प्रकल्पातून तेरसह ढोकी, येडशी, तडवळा गावास पाणीपुरवठा करण्यासाठी सन २००६ मध्ये प्राधिकरण अंतर्गत योजना सुरू करण्यात आली आहे़ जवळपास १६ कोटी रूपये खर्चाची ही योजना या गावातील ग्रामस्थांसाठी पाणी कमी अन् डोकेदुखी अधिक अशीच झाली आहे़ तेर गावास दोन हातपंप, एक कूपनलिका, आडातील पाणी आदींद्वारेही पाणीपुरवठा होतो़ मात्र, या जलस्त्रोतातील पाणीपातळीतही घट झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ झोपडपट्टी भागात राहणाऱ्या जवळपास ५० कुटुंबांची परवड गत अनेक वर्षापासून सुरू आहे़ प्राधिकरणने अद्याप या भागात पाईपलाईन केली नसल्याने पाण्यासाठी बारमाही भटकंती होत आहे़ त्यामुळे कधी उस्मानाबाद पाईपलाईनचे, कधी शाळेतील कुपनलिकेचे तर कधी शेतातील पाणी आणण्यासाठी या परिसरातील नागरिकांची भटकंती सुरू असते़ या झोपडपट्टीजवळच प्राधिकरणचा जलकुंभ आहे़ मात्र, याचा लाभ झोपडपट्टी वासियांना होताना दिसत नाही़ (वार्ताहर)शाळेसह शेतकऱ्यांचा आधारया परिसरातील नागरिक शाळेची कूपनलिका व माळी यांच्या शेतातील विहिरीचे पाणी भरून आपली गरज भागवत आहेत़ विजेच्या लपंडावामुळे आपापली कामे बाजूला ठेवून अगोदर पाणी भरावे लागत आहे़ त्यामुळे या परिसरात पाईपलाईन करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़लवकरच पाईपलाईनतेर येथील झोपडपट्टी परिसरातील पाईपलाईनबाबत जीवन प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, लवकरच पाईपलाईनचे इस्टिमेंट सादर करण्यात येणार आहे़ निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़अधिग्रहणाचे तीन प्रस्तावगावातील जलस्त्रोतांची अटलेली पाणीपातळी व निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे दोन कूपनलिका, एक विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविला आहे़ पंचायत समितीने सदरील प्रस्ताव तत्काळ मंजूर करून गावातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी होत आहे़