शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वॉचमनला बांधून ठेवत चोरट्यांनी कंपनीतील साडेबारा लाखांचे साहित्य केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 20:22 IST

गुन्हा करताना चोरट्यांनी कोणतेही पुरावे मागे राहू नयेत म्हणून वॉचमनचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा सोबत नेली.

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर): जळगाव रस्त्यावरील अन्वी येथील शेत गट क्र. २२६ मधील आकाश ऍग्रो प्रोसेसिंग कंपनीत दिगविजय इंडस्ट्रिज कंपनीचा नव्याने बसवलेला १६५० के.व्ही.चा विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची काँपर वायर (किंमत अंदाजे १०.५० लाख) आणि काँर्गोटाँप लँमेनेशन ५०० किलो (किंमत अंदाजे २ लाख) असा एकूण १२.५० लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ मार्च रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.  

या कंपनीत कामावर असलेले वॉचमन शंकर मुळे रात्री झोपेत असताना त्याला आवाज आल्याने तो उठला. मात्र, त्याच्या समोर तिघेजण चाकू घेऊन उभे होते. त्यांनी वॉचमनला धमकावले आणि चादर हटवू नकोस, अन्यथा तुझा जागेवरच खून करू, असे म्हणत त्याला गप्प बसण्यास भाग पाडले. चोरट्यांनी त्याचे हातपाय दोरीने बांधून मोबाईल काढून घेतला.  त्यानंतर अंदाजे ८ ते १० चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा व अन्य साहित्य चोरले. जवळपास १५०० लिटर ऑइल जागेवरच ओतून दिले. चोरी झाल्यानंतर सकाळी ६ वाजता चोरटे एक कार व पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून पसार झाले.  

गुन्हा करताना चोरट्यांनी कोणतेही पुरावे मागे राहू नयेत म्हणून वॉचमनचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा सोबत नेली. त्याचबरोबर त्याच्या दुचाकीच्या प्लगची वायर कापली, जेणेकरून तो लगेच कोणाला कळवू शकणार नाही. सकाळी ७ वाजता वॉचमनने जवळच्या हॉटेलवरून कंपनीचे मालक आकाश गौर यांना फोन करून माहिती दिली.  

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी ७.३० वाजता मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले. मात्र, अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही.  आकाश ऍग्रो कंपनीचे संचालक आकाशचंद्र गौरठाकुर (वय ५३, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी