शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

हडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 25, 2014 00:24 IST

औरंगाबाद : शनिवारी मध्यरात्री हडको एन-११ भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

औरंगाबाद : शनिवारी मध्यरात्री हडको एन-११ भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच रात्री आसपासची तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज पळविला. परिसरात वाढलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.घटनांबाबत मिळालेली माहिती अशी की, एन-११ परिसरातील गजानननगरातील रहिवासी माणिकचंद चुडीवाल हे शुक्रवारी कुटुंबासह नाशिकला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरला. आज पहाटे चुडीवाल गावाहून परत आले. तेव्हा दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला, कपाटातील दीड लाखाचा ऐवज गायब असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. चोरीची दुसरी घटना चुडीवाल यांच्या घराजवळच असलेल्या राजू लक्ष्मण काळोत्रे यांच्या घरी घडली. काळोत्रे हे शुक्रवारी रात्री गावी गेले होते. काल रात्री चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सुमारे पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय याच परिसरातील अन्य एक घरही चोरट्यांनी फोडले. या चोरीप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाता जाता चहा करून पिले चोरटे!गजानननगरातील माणिकचंद चुडीवाल यांच्या घरात चोरी केल्यानंतर जाता जाता चोरट्यांनी त्यांच्या घरात चक्क गॅसवर चहा करून पिला. पत्तीचा व साखरेचा डबा चोरट्यांनी शोधून काढला. मग गॅसवर चहा केला आणि चहा पिल्यानंतर तरतरी येताच चोरटे पुढे निघून गेले.