शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नातेवाईकाच्या घरातून पावणेदोन लाखाचे दागिने पळविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:48 PM

दागिने चोरून नेणा-या एकाला जवाहरनगर पोलिसांनी श्रीरामपुर येथून पकडून आणले.

औरंगाबाद: नातेवाईक प्राध्यापिकेच्या घरातून पावणे दोन लाखाचे दागिने चोरून नेणा-या एका जणाला जवाहरनगर पोलिसांनी श्रीरामपुर येथून पकडून आणले. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केली.  ही चोरी १६ आॅक्टोबर रोजी जवाहरनगर परिसरात घडली होती.

मकरंद कृष्णाजी आहेर (वय ३५, रा.श्रीरामपुर, जि. अहमदनगर)असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जवाहरनगर परिसरातील रहिवासी प्राध्यापिका सुवर्णा पवार यांच्या पतीचा दुरचा नातेवाईक आहे. आरोपी हा १६ आॅक्टोबर रोजी कामानिमित्त औरंगाबादेत आला होता. पाहुणा असल्याने पवार कुटुंबियांनी त्याला त्यांच्या एका बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले. त्या रूममध्ये त्यांचे कपाट होते. या कपाटाला चावीही तशीच होती. पाहुणाच असल्याने कपाटातील दागिने त्यांनी नेहमीप्रमाणे ठेवले होते.

दुस-या दिवशी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास मकरंद हा गावी परत गेला. गावी जाताना मात्र त्याने पवार यांच्या घरातील प्लायवूड कपाटात ठेवल्या पाच तोळ्याचा हार, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, पाच ग्रॅमचे टॉप्स असा सुमारे पावणे दोन लाखाचे दागिने चोरून नेले. दोन दिवसानंतर त्यांना त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समजले.

पोलिसांत  तक्रार प्राप्त होताच जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  निरीक्षक शारदा वायदंडे, डी.बी. पथकाचे कर्मचारी वानखेडे, अकोले, चव्हाण यांच्या पथकाने श्रीरामपुर येथे जाऊन आरोपीला पकडले. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत चूक झाल्याचे मान्य करीत घरात लपवून ठेवलेल दागिने काढून दिले. त्याच्याकडील दागिने जप्त करून पोलीस त्याला औरंगाबादेत घेऊन आले. सहायक निरीक्षक वायदंडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक