गाणे वाजविण्यातून वाद झाला अन एकाने घेतला चौघांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:56 IST2021-05-25T12:46:16+5:302021-05-25T12:56:08+5:30

टेपवर गाणे वाजविण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांतील सदस्यांना घेतला चावा

There was an argument over playing the song and one of them bites four neighbors | गाणे वाजविण्यातून वाद झाला अन एकाने घेतला चौघांना चावा

गाणे वाजविण्यातून वाद झाला अन एकाने घेतला चौघांना चावा

ठळक मुद्देआरोपीने टेपवर मोठ्या आवाजात गाणे का वाजवीत होता, या कारणावरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली

वाळूज महानगर : टेपवर मोठ्या आवाजात गाणे वाजविण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाने चौघांना चावा घेतल्याची घटना रविवारी (दि. २३) सायंकाळी साजापुरात घडली.

प्रमोद विश्वनाथ इच्छे (वय ३२) हा कुटुंबासह साजापुरात वास्तव्यास असून, अ‍ॅपेचालक म्हणून काम करतो. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रमोद याच्या घराशेजारी राहणारा शेख अन्वर याने प्रमोद यांंना तू शनिवारी टेपवर मोठ्या आवाजात गाणे का वाजवीत होता, या कारणावरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रमोद हे अन्वर यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अन्वर याने त्यांना मारहाण करीत डाव्या करंगळीला चावा घेतला. पतीला मारहाण होत असल्याचे दिसताच प्रमोद याची पत्नी कोमल भांडण सोडविण्यासाठी आली असता अन्वरची पत्नी व मुलगा या दोघांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत कोमल खाली पडल्यानंतर अन्वर याने तिच्या मांडीला चावा घेतला. 

हा वाद सुरू असताना शेजारी वास्तव्यास असणारे नवनाथ कीर्तीकर व त्यांची पत्नी सीमा कीर्तीकर हे भांडण सोडविण्यासाठी आले असता अन्वर शेख, बानोबी व अरबाज या तिघांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अन्वर याने नवनाथ याच्या पाठीला, तसेच सीमा हिच्या उजव्या भवईवर चावा घेऊन या दोघांनाही जखमी केले. या मारहाणीनंतर अन्वर शेख याने प्रमोद यांच्या अ‍ॅपेरिक्षावर वीट फेकून मारत रिक्षाची काच फोडली. या मारहाणप्रकरणी प्रमोद ईच्छे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: There was an argument over playing the song and one of them bites four neighbors