शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

By admin | Updated: August 25, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शासनाने

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शासनाने घसघशित वाढ केली आहे. पूर्वी राष्ट्रीय कलावंताला प्रतिमाह १ हजार ४०० रूपये अनुदान मिळत होते. ते आता २ हजार १०० रूपये करण्यात आले आहे. त्यामुळे एका लाभार्थ्याला आता वर्षाकाठी १६ हजार ८०० ऐवजी २५ हजार २०० रूपये मानधन मिळणार आहे. अशाच पद्धतीने राज्यस्तरीय आणि स्थानिक कलावंतांच्या मानधनात वाढ झाली आहे.कलावंत मानधन योजनेअंतर्गत २००९ च्या शासन निर्णयानुसारच लाभार्थ्यांना मानधन दिले जात होते. दिवसेंदिवस महागई वाढत चालल्याने मानधनाच्या रक्कमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी साहित्यिक व कलावंतांतून होत होती. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरवाही करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेवून शासनाने कलावंतांच्या मानधनामध्ये तब्बल दीड पटीने वाढ केली आहे. सदरील आदेश २२ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कलावंततांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)२००९ च्या निर्णयानुसार राष्ट्रीय कलावंतांना प्रतिमाह १४०० रूपये या प्रमाणे वर्षाकाठी १६ हजार ८०० रूपये इतके मानधन मिळत होते. आता ते प्रतिमाह २ हजार १०० रूपये या प्रमाणे २५ हजार २०० रूपये इतकी रक्कम मिळणार आहे. राज्यस्तरीय कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. या कलावंतांना आता प्रतिमाह १ हजार २०० वरून १ हजार ८०० रूपये मानधन मिळेल. तर स्थानिक कलावंतांना आता १ हजार रूपयांवर १ हजार ५०० रूपये मिळणार आहेत.