शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

संधीचा गैरफायदा नाही, उलट सोनेच केले; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:49 IST

आयुष्यात खोटे बोलायचे नाही, हे पक्के ठरविले. चूक झाली तर प्रांजळपणे मान्य करायचे.

छत्रपती संभाजीनगर : मला जे काम सांगितले ते प्रामाणिकपणे करत गेलो. कोणी करत नसलेली कामेही करीत होतो. जेव्हा संधी मिळाली, तिचा कधीच गैरफायदा घेतला नाही. उलट त्या संधीचे सोने कसे करता येईल, असे काम केले, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात बागडे यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, अब्दुल सत्तार यांच्यासह संत, महंत संप्रदायातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारात बागडे यांचे सप्त चिरंजीव पूजन करण्यात आले. बागडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ दिवे लावून सुहासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. नाणेतुला उपस्थित संत-महंतांच्या हस्ते करण्यात आली. बागडे म्हणाले की, आयुष्यात खोटे बोलायचे नाही, हे पक्के ठरविले. चूक झाली तर प्रांजळपणे मान्य करायचे. वैयक्तिक मी कोणालाच त्रास दिला नाही. २०२४ मध्ये निवडणूक लढवायची नाही हे दीड वर्षांपूर्वी घोषित केले होते. शेती, दूध संघ, कारखाना, शाळेकडे लक्ष द्यायचे ठरले. २७ जुलै २०२४ रोजी अचानक पंतप्रधानांचा फोन आला. त्यांनी मला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे संकेत दिले. रात्री उशिरा राजस्थानच्या राज्यपालपदी घोषणा झाल्याचे बागडे म्हणाले.

कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजनसभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला टोपी, उपरणे, संत, महंत यांचा सन्मान, प्रत्येकाला बोलण्याची संधी असे शिस्तीत कार्यक्रमाचे नियोजन केले होते. रामूकाका शेळके, रमेशअण्णा मुळे, राधाकिसन पठाडे, सजनराव मते, जावेद पटेल, सुदाम ठोंबरे, सुहास शिरसाट, संजय खंबायते, दामूअण्णा नवपुते आदींनी परिश्रम घेतले.

नाना यांना उपराष्ट्रपती करारामराव महाराज ढोक यांनी नानांची (बागडे) स्तुती केली. नानांचे दात शाबूत आहेत, कारण त्यांनी कोणावर दात खाल्ला नाही. उपराष्ट्रपतिपदावर नानांची वर्णी लागावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळकृष्ण महाराज गिरगावकर यांनी वारकरी संप्रदायातील एकाला आमदार करण्याची विनंती बागडे यांना केली.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर