देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तब्बल १६ विद्यापीठे, कोट्यवधी विद्यार्थी घेत आहेत शिक्षण
By शांतीलाल गायकवाड | Updated: April 14, 2025 06:18 IST2025-04-14T06:17:05+5:302025-04-14T06:18:20+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: विद्यापीठेच नव्हे तर देशभरातील हजारो शाळा, महाविद्यालये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहेत.

देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तब्बल १६ विद्यापीठे, कोट्यवधी विद्यार्थी घेत आहेत शिक्षण
-शांतीलाल गायकवाड, छत्रपती संभाजीनगर
ज्या विद्यार्थ्याने शाळेबाहेर बसून शिक्षण घेतले, त्यांच्या नावाने आज भारतात एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यातील दोन ओपन युनिव्हर्सिटी असून शेकडो महाविद्यालयांतून कोट्यवधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जगभरातील हजारो शैक्षणिक संस्थाही प्रज्ञासूर्य, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहेत.
डॉ. बाबासाहेबांना प्रज्ञासूर्य म्हणून संबोधले जाते. शिक्षण व प्रज्ञा या शब्दांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पर्यायी शब्दच ठरलेला आहे. विद्यापीठेच नव्हे तर देशभरातील हजारो शाळा, महाविद्यालये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहेत. महाराष्ट्रात १२०हून अधिक वसतिगृहे या महामानवाच्या नावे आहेत.
दोन मुक्त विद्यापीठांना डॉ. आंबेडकर यांचे नाव
देशात १८ मुक्त विद्यापीठे असून त्यातील दोन मुक्त विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे.
यातील एक गांधीनगर (गुजरात) येथे तर दुसरे मुक्त विद्यापीठ हैदराबाद (तेलंगणा) येथे कार्यरत आहे.
विद्यापीठांची नावे अशी
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे , रायगड.
३) बाबासाहेब भीमराव आंबेडकर, बिहार युनिव्हर्सिटी, मुझ्झफरपूर.
४) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश.
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्ली, नवी दिल्ली.
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, इटचेर्ला, आंध्र प्रदेश
८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशियल सायन्सेस, इंदूर
९) डॉ. भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी,आग्रा
१०) डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, चेन्नई.
११) डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, बंगळुरू, कर्नाटक.
१२) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सोनपत, हरयाणा
१३) डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान.
१४) बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल.