शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

...तर विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पंचनाम्यांना लागणार वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 5:46 PM

विमा कंपनी प्रतिनिधींच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी 

ठळक मुद्देओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परवड  शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम आॅक्टोबरच्या उत्तरार्धानंतर आणि नोव्हेंबर महिन्यातील पूर्वार्धात झालेल्या पावसाने हिरावून नेला. विमा कंपन्या शेतकऱ्यांची परवड करीत असून, स्वतंत्र पंचनामे करण्याची भूमिका काही कंपन्यांनी घेतली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विमा कंपनी प्रतिनिधींची याप्रकरणी कानउघाडणी केली आहे. दिवसाकाठी ३ ते ४ हजार पंचनामे कंपन्यांकडून होत असतील वर्षभर कंपन्यांना पंचनामे करण्यास जातील, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कंपन्यांचे उंबरठे झिजवायचे काय? अशा शब्दात विमा कंपन्यांना आयुक्तांनी झापले. प्रशासकीय पंचनाम्यांच्या आधारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी विमा कंपन्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विभागीय प्रशासनाने केलेले पीक नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याची तरतूद करण्यास तरी नकार दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांनी सहा शासकीय आणि दोन खाजगी विमा कंपन्यांची गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. हिंगोली आणि जालना जिल्ह्यात बजाज अलियान्झ कंपनीने पीकविमा काढला आहे. विमा कंपन्यांची अरेरावी वाढल्याचे आयुक्तांच्या आढावा बैठकीत निदर्शनास आले. शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप काही कंपन्या करीत आहेत.

यावर विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय पंचनाम्यांचा आधार घेऊन तातडीने मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. २२ लाख हेक्टरवरील नुकसानीचा सुरुवातीचा अंदाज आयुक्तांनी सूक्ष्म नियोजन करून केलेल्या पाहणीमुळे फोल ठरला. ४१ लाख ४० हजार १७५ हेक्टरवरील खरीप हंगामाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना या आधारेच मोबदला द्यावा लागेल. विमा कंपन्यांचे दावे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्यास थोडा विलंब होणार आहे. रबी पेरण्यांच्या काळात विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार विभागीय प्रशासनाने परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून २९०४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई विभागाला लागेल, असा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार केंद्रीय पथक पाहणीसाठी विभागात येईल. पथक येईपर्यंत शेतात नुकसानीचे दृृश्य नसेल, त्यासाठी प्रशासनाने आताच छायाचित्रे, व्हिडिओ शूटिंग करून ठेवले आहे. विमा कंपन्या ऐनवेळी नाटकं करतील, त्यासाठी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी खबरदारी घेत पूर्ण तपशील तयार करून ठेवण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMarathwadaमराठवाडा