शहरात पाच दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:12+5:302021-07-18T04:04:12+5:30

रवि अर्जुन चिंचोलकर (३७, रा. संभाजी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल) यांनी २९ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी ...

Theft of five bikes in the city | शहरात पाच दुचाकींची चोरी

शहरात पाच दुचाकींची चोरी

रवि अर्जुन चिंचोलकर (३७, रा. संभाजी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल) यांनी २९ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (क्र. एमएच २० बीआर ३००८) उभी केली होती. त्यांची दुचाकी मध्यरात्री चोराने लांबवली. आदिल हबीब मोहम्मद (२१, रा. बाबर कॉलनी, कटकट गेट) याने ३० जून रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास उस्मानपुरा, ज्योतीनगरातील सिध्दिविनायक अपार्टमेंटसमोर दुचाकी (क्र. एमएच २० सीपी ००९८) उभी केली होती. चोराने अवघ्या दहा मिनिटात त्याची दुचाकी लांबवली. शेख अब्दुल रईस अब्दुल रशीद (४०, रा. शम्सनगर, शहानूरवाडी) याने १२ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमजीएम रुग्णालयासमोर दुचाकी (क्र. एमएच २० डीवाय ११९५) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी दोन तासात लंपास केली. तसेच पुष्कर महादेव रानडे (४९, रा. कौस्तुभा कल्पना हाऊसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन रोड, बन्सीलालनगर) यांची ७ जुलै रोजी घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एमएच २० डीआर ७४३६) मध्यरात्री चोराने लांबविली, तर मोहन सुभाष सोनवणे (३३, रा. धनगर गल्ली, वाळुज) यांनी १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनीषानगरातील एका हॉटेलसमोर दुचाकी (क्र. एमएच २० एफटी ११३८) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Theft of five bikes in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.