२४ तासात ६ दुचाकींची चोरी; नाकाबंदी भेदून शहरात वाहन चोर सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:46 IST2021-05-18T19:44:46+5:302021-05-18T19:46:51+5:30
प्रमुख ५४ नाक्यावर रात्रंदिवस तैनात नाकाबंदी भेदून वाहनचोरांनी पोलिसांना मात दिली आहे.

२४ तासात ६ दुचाकींची चोरी; नाकाबंदी भेदून शहरात वाहन चोर सुसाट
औरंगाबाद: शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख ५४ नाक्यावर रात्रंदिवस तैनात नाकाबंदी भेदून वाहनचोरांनी पोलिसांना मात दिली आहे. गेल्या २४ तासात शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी ६ मोटारसायकली पळविल्याची गुन्हे दाखल झाले.
सुभेदारी गेस्ट हाउस येथील रहिवासी शाहेद अली शौकत अली यांची मोटारसायकल ( एम एच २० बीझेड ८८००) टाऊन हॉल येथील हॉटेल मिडटाउन समोरून चोरट्यांनी पळविली. शाहेद यांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. छावणी परिसरातील रहिवासी मोहम्मद शाहीद मसूद शेख यांची मोटारसायकल (एमएच २० सीव्ही ४७८६) चोरट्यांनी १४ मे रोजी सकाळी पानचक्कीजवळून पळविली.
तिसऱ्या घटनेत घाटी रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या पार्किंगमध्ये उभी दुचाकी ( एम एच २०बीएम ५४७७) १२ मे रोजी भरदिवसा चोरी झाली. समाजकार्य अधीक्षक नरेंद्र भास्कर भालेराव यांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
चौथी घटना नागेश्वरवाडीतील प्रियदर्शिनीनगरात १६ मे झाली. चोरट्यांनी घरासमोर उभी मोटारसायकल ( एम एच २० बीयू ०२२०) चोरून नेली. याविषयी विठ्ठलराव आनंदराव शिंदे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
अन्य एका घटनेत भावसिंगपुरा परिसरातील गोल्डन सिटी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी मोटारसायकल ( एम एच २० डीपी ०८३५)चोरट्यांनी १६ मे रोजी लंपास केली. याविषयी शेख इमरान शेख बापूजी यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
नंदनवन कॉलनीतील परिस धनलक्ष्मी हाऊसिंगच्या वाहनतळावरून चोरट्यानी दुचाकी (एम एच २० बीडी ३७७८) चोरून नेली. १५ मे रोजी रात्री झालेल्या या चोरीविषयी दिलीपकुमार रामचंद्र तिवारी यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.