करमाडमध्ये दारुचे १०५ बॉक्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:50 IST2019-06-28T20:50:27+5:302019-06-28T20:50:38+5:30
येथील २१ सेक्टरमधील दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूचे १०५ बॉक्स लंपास केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

करमाडमध्ये दारुचे १०५ बॉक्स लंपास
करमाड : येथील २१ सेक्टरमधील दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूचे १०५ बॉक्स लंपास केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हाईसही चोरून नेला.
औरंगाबाद-जालना मार्गावर २१ सेक्टर नावाची वसाहत असून, परिसरात नितीन दुगार्लाल जैस्वाल यांचे दारुचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा नितीन यांनी दुकान बंद करून ते औरंगाबादला गेले.
दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून सव्वा पाच लाखांचे ५० देशी दारूचे व विदेशी दारूचे ५५ बॉक्स असे एकूण चोरट्यांनी चोरून नेले. नितीन जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. औरंगाबाद येथून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.