शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात १३ वर्षांनंतर एन्काउंटरचा थरार; जाणून घ्या आतापर्यंतच्या ५ चकमकीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:15 IST

जवळपास पाच वेळा शहरात पोलिसांनी गुन्हेगार, अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.

छत्रपती संभाजीनगर: तब्बल १३ वर्षांनंतर शहरात एन्काउंटरचा थरार घडला. २०१२ मध्ये एटीएसतर्फे हिमायत बागेजवळ अतिरेक्यांचे एन्काउंटर करण्यात आले होते. जवळपास पाच वेळा शहरात पोलिसांनी गुन्हेगार, अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.

१. २७ मे १९९८ रोजी मध्यरात्री शहानूरमियाँ दर्गा परिसरातील नाल्यात दीपक भोंड या दरोडेखोराचे एन्काउंटर झाले होते. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त सदानंद वायसे पाटील यांनी हे एन्काउंटर केले होते.

२. २००२ मध्ये वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक जेम्स अंबिलढगे यांनी दरोडेखोर पोपट काळे याचे एन्काउंटर केले होते.

३. १४ मे २००४ रोजी आंबेडकरनगरमध्ये तत्कालीन उपनिरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी कुख्यात गुंड व चोर विलास सुरडकर याचे एन्काउंटर केले होते. घराच्या छतावरून पळताना माळाळे यांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या.

४. २०१२ मध्ये एटीएसचे तत्कालीन प्रमुख नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी हिमायत बागेजवळ अतिरेकी अझर कुरेशीचे एन्काउंटर केले होते.

५. २७ जून २०२५ रोजी वाळूज एमआयडीसीमध्ये उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचे एन्काउंटर  गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे यांनी केले.

असे झाले अमोल खोतकरचे एन्काउंटर- लड्डा दरोडा प्रकरणातील लुटीचे बहुतांश दागिने अमाेलकडेच असल्याने त्याला नऊ पथके हुडकत होती. मात्र, अमोल कारमधून गावे बदलत फिरत होता. गुन्हे शाखेने गेल्या तीन दिवसांत अमोल वगळता इतर सर्वांना ताब्यात घेतले होते. सोमवारी रात्री अमोल त्याच्या साई गार्डन अँड लॉजिंग येथे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.- वरिष्ठांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे, अंमलदार मनोहर गित्ते, यशवंत गोबाडे, परभत म्हस्के यांच्यासह ११ वाजता लॉजवर गेले. लॉजबाहेरच दरोड्यात वापरलेल्या पांढऱ्या स्विफ्ट डिजायरच्या चालकाच्या सीटवर अमोल, तर मागच्या सीटवर त्याची मैत्रीण हाफिजा अक्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) बसलेली होती. अमाेलने पोलिसांना पाहताच शिवीगाळ करून गाडी रेस केली. पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने त्यांच्या अंगावर कार घालत कारच्या खिडकीतून पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी ती चुकवली. मात्र, कारच्या धडकेत अंमलदार गित्ते यांच्या पायाला मोठी जखम झाली. अमाेल दुसरी गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच गच्चे यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून अमोलच्या दिशेने गोळी झाडली. गच्चे यांनी झाडलेली गोळी अमाेलच्या उजव्या खांद्याखाली लागली. मात्र, अंतर कमी असल्याने ती उजव्या खांद्यातून छातीत डावीकडे जाऊन रुतली. त्यामुळेच त्याचा काही मिनिटांत मृत्यू झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस