अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:54 IST2025-07-08T12:54:22+5:302025-07-08T12:54:55+5:30

झालर क्षेत्रातील २६, ‘सीएसएमआरडीए’च्या ३१३ गावांकडे मोर्चा वळवा; विभागीय आयुक्तांच्या मनपा, पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत सूचना

The scope of Chhatrapati Sambhajinagar's encroachment removal campaign will increase; march towards 339 villages of Jhalar and 'CSMRDA' | अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा

अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : सिडकोने झालर क्षेत्रातील नियोजन केलेल्या २६ गावांतील १५ हजार हेक्टर जागेसह छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (सीएसएमआरडीए) असलेल्या ३१३ गावांतील महामार्ग, जिल्हाप्रमुख मार्ग आणि अनधिकृत बांधकामांनी केलेल्या अतिक्रमणांकडे मोर्चा वळवावा, अशी सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (दि. ७) स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. बैठकीला महपालिका, पोलिस, जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सातारा-देवळाई ही गावे मनपा हद्दीत असून बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सहजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर ही गावे प्राधिकरणाकडे वर्ग झाली आहेत. सुंदरवाडी गट क्र. ९ व १० वगळून वर्ग झाले आहे. त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.

प्राधिकरणाकडे असलेल्या गावांची जबाबदारी
छत्रपती संभाजीनगर : १४३
गंगापूर : ६७
फुलंब्री : १९
खुलताबाद : ४१
पैठण : ४३
झालर क्षेत्र : २६
एकूण.... ३४२

आठ दिवसांत कारवाई करू
प्राधिकरण हद्दीत सुमारे १५ हजार बांधकामे अनधिकृत आहेत. ती बांधकामे गुंठेवारीअंतर्गत नियमित झाली पाहिजेत. ती नियमित झाली नाहीतर त्यावर कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, जालना रोड, समृद्धी महामार्ग, झालर क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे झालेली आहेत. अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची मदत घेण्यात येईल. आठ दिवसांत अतिक्रमणे नियमित केली तर ठीक, अन्यथा प्राधिकरण कारवाई करील, असे आयुक्त पापळकर यांनी सांगितले.

Web Title: The scope of Chhatrapati Sambhajinagar's encroachment removal campaign will increase; march towards 339 villages of Jhalar and 'CSMRDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.