शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

निकृष्टतेचा कळस; छत्रपती संभाजीनगरच्या ५१ वर्ष जुन्या जलवाहिन्यांपेक्षा वर्षभरापूर्वीची जलवाहिनी अधिक फुटते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:56 IST

मुंबई उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाख नागरिकांची तहान सध्या तीन जलवाहिन्यांवर अवलंबून असून, यातील दोन जलवाहिन्यांचे आयुष्य ५० आणि ३३ वर्षे आहे. नियमानुसार या जलवाहिन्या कालबाह्य झालेल्या आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्याचा ९० टक्के भार आजही याच जलवाहिन्या उचलत आहेत. सातत्याने या जलवाहिन्या फुटत असतात. पण, मागील वर्षीच टाकलेली ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी मागील तीन महिन्यांत तब्बल पाच वेळा फुटली. या जलवाहिनीच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

शहराला पूर्वी हर्सूल तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. १९७३ च्या दुष्काळात हर्सूल तलावातही पाणी नव्हते. तेव्हा हिमायतबागेतील शक्करबावडीने शहराची तहान भागविली होती. तत्कालीन मंत्री डॉ. रफीक झकेरिया यांनी युद्धपातळीवर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकून दिली. कालांतराने या जलवाहिनीचे पाणी कमी पडू लागल्याने १९९२ मध्ये १२०० मिमी व्यासाची दुसरी जलवाहिनी टाकली. म्हणजे ७०० च्या जलवाहिनीचे आयुष्य ५० वर्षांहून अधिक, तर १२०० च्या जलवाहिनीचे ३३ वर्षांहून अधिक झाले. ऑक्सिजनवर असल्यासारखी या जलवाहिन्यांची अवस्था झाली आहे.

२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे पाणी येण्यास विलंब होत असल्याने मागील वर्षी तातडीने ९०० मिमीची जलवाहिनी खास शहरासाठी टाकली. तीही मागील तीन महिन्यांत पाच वेळेस, तर वर्षभरात १२ वेळेस फुटल्याची माहिती आहे.

९०० ची जलवाहिनी तीन महिन्यांत कुठे फुटली ?- २० जानेवारीला फारोळा येथे जलवाहिनीचे पाइप निखळले.- २१ रोजी दुरुस्ती करताना पुन्हा जलवाहिनीचे पाइप त्याच ठिकाणी निखळले.- ८ फेब्रुवारीला धनगाव येथे जलवाहिनीला अक्षरश: भगदाड पडले होते.- १० मार्चला टाकळी फाटा येथे जलवाहिनी फुटली.- २२ मार्चला फारोळा येथे जलवाहिनीचे पाइप निखळले.७०० आणि १२०० जलवाहिन्या तीन महिन्यांत कुठे फुटल्या ?- १४ फेब्रुवारीला ७०० मिमी जलवाहिनी पिंपळवाडी येथे फुटली.- ७ मार्चला जायकवाडी तांत्रिक बिघाड दोन दिवस शहराचे पाणी बंद- ३ मार्चला ७०० मिमी जलवाहिनी जायकवाडीजवळ फुटली.-२२ मार्चला रेल्वेस्टेशनजवळ १२०० मिमीची दुरुस्ती ३० तासांचे शटडाऊन.

मागील वर्षभरात कोणती जलवाहिनी किती वेळेस फुटली ?जलवाहिनीचा व्यास-------------------------किती वेळेस ?७०००---------------------------------------१०९००-------------------------------------------९१२००----------------------------------------८

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी